Kolhapur Tourism

Kolhapur Tourism Travellers to and from Kolhapur, Tourist place around Kolhapur, Hotel Booking, Restaurants, Travel Guide,
Traveller reviews, upcoming Events,
(1)

26/09/2023
17/04/2022
02/04/2022

पन्हाळा गडाच्या गड घेऱ्यातील अनेक गावांनी आपला ऐतिहासिक वारसा जपला आहे. सांस्कृतिक व ऐतिहासिक पाऊलखुणा जपणाऱ्य.....

31/03/2022
21/03/2022

नमस्कार मित्रहो...कोकणी रान माणूस चा आतापर्यंत चा तळ कोकण आणि गोव्यातील प्रवास आपण Youtube व्हिडिओज मधून अनुभवलात...ज्य....

03/11/2021
29/10/2021

🚩कोल्हापूर हायकर्स 🚩आयोजित
✨"एक सांज पन्हाळगडवर"✨【वर्ष ९】

इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव !!

🔸दीपोत्सव कार्यक्रमाचे वेळ.
🔅दिनांक : २ -११- २०२१ रोजी
रात्री ७:०० ते वाजल्यापासून रात्री ११.०० वाजेपर्यंत असेल

आज प्रत्येकाने आपापल्या घरी दिवाळी उत्साहात कशी साजरी करायची याचे नवनवीन संकल्प करून त्याप्रमाणे तयारीला सुरुवात ही केली आहे.
पण आपल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे घर म्हणजे गडकिल्ले यांच्याविषयी काय???
ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय तेच गड - किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात.
एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना कधी पाहायला मिळणार दिवाळी ..???
कधी अनुभवणार ते गडकोट देखील दिवाळीची सांज......???
आणि म्हणूनच कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुन्हा एकदा साजरी करूया "एक सांज पन्हाळगडवर" स्वराज्याच्या गडकोटांवर

✨"एक सांज पन्हाळगडवर"✨
धनत्रयोदशी ची संध्याकाळ..

वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून कोल्हापूर हायकर्स या ग्रुपची ओळख. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात कोल्हापूर हायकर्स नेहमीच पुढे असतात.
आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात.
नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या ८ वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. शिव मंदिराचे पूजन करून या दीपोत्सवाची सुरुवात होत आहे. या उपक्रमासाठी सर्वांना मोफत सहभागी होता येणार आहे. शिवप्रेमीं येताना स्व: इच्छेने मेणाच्या पणतीचे एक पाकीट घेऊन येऊ शकतात. सदर उपक्रम हा सोशल डडस्टनशसगं पाळून,मास्क चा योग्य वापर करून व मोजक्या लोकांच्या उपजस्थिीि पार पडला जाणार आहे.

===========÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷===========

🔸(शिवप्रेमींना विनंती की कोणीही फटाके सोबत आणू नये. पर्यावरणाचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे आणि त्याची जाणीव आपणा सर्वांना असणे महत्वाचे आहे.)

पुन्हा एकदा साजरी करूया "एक सांज पन्हाळगडवर" स्वराज्याच्या गडकोटांवर

===========÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷===========
📞अधिक माहितीसाठी संपर्क
८२३७०७९९९९ / ९५७९९९७९९९

संस्थापक,
सागर श्रीकांत पाटील,
🚩 #कोल्हापूर_हायकर्स
www.kolhaurhikers.com Kolhapur Tourism

21/10/2021
30/08/2021
https://www.youtube.com/watch?v=3DyCejhWf5cकोल्हापूरातील वाकरे गावात 1000 वर्षे जुनी एक रचना सापडली असून ती विहीर किंवा ...
04/06/2021

https://www.youtube.com/watch?v=3DyCejhWf5c

कोल्हापूरातील वाकरे गावात 1000 वर्षे जुनी एक रचना सापडली असून ती विहीर किंवा तळे अशा स्वरूपात आहे . वाकरे गावातल्या एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात ही विहीर किंवा तळेसदृश्य रचना सापडली आहे.

कोल्हापूरातील वाकरे गावात 1000 वर्षे जुनी एक रचना सापडली असून ती विहीर किंवा तळे अशा स्वरूपात आहे . वाकरे गावातल्या .....

Chuli Jain Temple at Halvad- Dhangadhra highway, Gujarat. Photos from outside. Photos inside temple not allowed. Do see ...
22/02/2021

Chuli Jain Temple at Halvad- Dhangadhra highway, Gujarat. Photos from outside. Photos inside temple not allowed. Do see each pic zooming it. It's mesmerizing

आज मार्गशीर्ष गुरुवार सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
07/01/2021

आज मार्गशीर्ष गुरुवार

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

15/11/2020

उद्यापासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर सुरू होणार आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीने नियमावली तयार केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या आज, तर यातील प्रमुख अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर यासह सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 3042 मंदिर उद्या खुली होणार आहेत.

IMP - उद्यापासून भाविकांना सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार.

1. दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार.

2. पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश तर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग राहणार.

3. मंदिराच्या आतील आवारातील दुकान बंद राहणार.

4. भाविकांना कासव चौक-पितळी उंबऱ्या पासूनच अंबाबाई देवीचे दर्शन घ्यावे लागणार.

5. भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही.

6. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश मिळणार.

7. मास्क नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

8. मंदिर आवारात कोणत्याही भक्ताने मास्क काढला असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.

9. 10 वर्षाखालील लहान मुलं आणि जेष्ठ वयोवृद्ध नागरिकांना तूर्तास दर्शन नाही.

10. आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकींग द्वारे करण्यात येणार.

Tripura Pornima
23/11/2018

Tripura Pornima

18/11/2018
May this season of lights brighten your world 🌏
04/11/2018

May this season of lights brighten your world 🌏

08/08/2018
27/06/2018

Napane Waterfall vaibhav wadi.

*नापणे धबधबा*

शंभर फुटांवरून कोसळणारे पाणी, त्यातून निघणारे दवबिंदू, 40 फूट उंचीचा डोह, पक्ष्यांचा किलबिलाट आणि धबधब्याच्या दोन्ही बाजूंनी वेढलेली वृक्षवल्ली असे अद्‌भुत आणि निसर्गाने भरभरून दिलेले ठिकाण म्हणजे नापणे धबधबा. राज्यासह परराज्यांतील शेकडो पर्यटक या धबधब्यावर येतात आणि पर्यटनाचा आस्वाद लुटतात. धबधब्याच्या वरच्या बाजूस नाधवडे तिथे महादेवाचं मंदिर आहे. त्या नजीक दगड कपारीतून पाण्याचा प्रवाह वर येतो. तीच ही नदी पुढे नापणे धबधब्यापर्यंत जाते. बारमाही वाहणारा जिल्हा परिसरातील हा एकमेव धबधबा आहे. त्यामुळे इतर धबधब्यांचे पाणी आटल्यानंतर पर्यटकांचा ओढा या धबधब्याकडे वाढतो. धबधब्याचे पाणी ज्या कड्यावरून कोसळते, त्या पाण्यावरून व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घेता येतो. दोरीवरून लटकत जाणाऱ्या व्यक्तीला धबधब्याचे कोसळणारे पाणी, डोह अगदी जवळून पाहता येते. हे साहसी पर्यटन असले, तरी यामध्ये कोणताही धोका नाही. नापणे धबधबा हे अप्रतिम पर्यटनस्थळ आहे.

*जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :* भालचंद्र महाराज आश्रम

13/06/2018

.दुधसागर धबधबा कसे जाल ? वाचा आणि शेअर करा 👍 👍

दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडोवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.

धबधब्यापसून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कॅसलरॉक रेल्वे स्थानक आहे. या स्थानकापर्यंत रस्त्यानेसुद्धा पोहोचता येते. तिथून रेल्वेने दूधसागर धबधब्यापर्यंत जाता येते. दूधसागर रेल्वे थांब्याला फलाट नाही. प्रवासी आणि पर्यटकांना रेल्वेच्या या अनियोजित १ ते २ मिनिटांच्या थांब्यामध्ये रेल्वेतून उतरून रुळावरून धबधब्यापर्यंत १-२ किमी चालत जावे लागते. अलिकडे भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना दूधसागर थांब्याला उतरण्यास मनाई केली आहे. धबधब्याच्या आसपास स्वच्छ पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची कुठेही सोय नाही. तसेच तिथे मोबाईल सिग्नलही मिळत नाही आणि रस्त्यानेही तिथपर्यंत पोहोचता येत नाही. धबधब्याला भेट देताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दूधसागर धबधबा ट्रेकिंगचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक ट्रेकिंग संस्था पावसाळ्यात दूधसागर धबधब्याचे ट्रेक आयोजित करतात ज्यामध्ये कॅसलरॉक स्टेशनपासून धबधब्यापर्यंतचे अंदाजे २१ किमीचे ट्रेक आणि धबधब्याच्या पायथ्याशी एक दिवसाचा मुक्काम यांचा समावेश आहे.

आड वाटेवरचे कोल्हापूर
28/05/2018

आड वाटेवरचे कोल्हापूर

16/04/2018

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919552510195

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kolhapur Tourism:

Share


Other Kolhapur travel agencies

Show All