Global Vision International School, Nashik

Global Vision International School, Nashik Welcome to Global Vision International School -Nasik, our page is the fastest way to get updates about our School programs and activities. Pre Primary.
(31)

The School is unique because it is based on the concept “Learning through Activity”. It has been discovered and proved that the most vital years in any person’s life to form prominent features of personality starts from childhood to adolescence i.e. 2.5 to 16 years of age. After birth, at the very early age, a child’s mind is like a sponge, it absorbs everything it sees, it feels, it hears and wha

tever it observes. Children learn new things very fast. Hence In every school, the management should think and act very alertly while nurturing and educating the child and this is done at Global Vision International School with a lot of love and care. GVIS has bifurcated its syllabus (CBSE & SSC) right from the grass root level, i.e. It helps the children to cope up with the chosen curriculum right from the Nursery class. The students don’t face any hassles in when they enter in Grade I, whether it is CBSE or SSC, as their foundation is very strong.

“Nothing is as pious as knowledge.” Following this philosophy, we have designed the curriculum of pre-primary very sensitively and with utmost care. Today’s generation is advanced and smart, so most advanced technologies should be used to impart the knowledge skillfully. We use Smart Boards. Our teachers prepare their own audio visual power point presentations (PPT) of every lesson. We have observed the tremendous, wonderful impact on students learning by the continuous use of smart boards. We not only make use of the advance technology only; but also use different latest as well as traditional resources for the development and growth of our students. We arrange a number of field trips and excursions relevant to the lessons and subjects to give our students practical knowledge through real experience. For e.g. Language teachers take students to show Book Exhibitions, Public libraries, Kusumagraj Udyan, Theatre show, Drama etc. so that the students come to know about various types of books and other literary forms other than their academic texts. Science related field visits are arranged to Botanical Gardens, Medicinal Factories, Chocolate, biscuits making factories, Medical Shops, Hospitals, Planetarium, Science Exhibition etc. There are outdoor activities which develop students into bold and all round personalities.

15/06/2024
Fathers are invited to attend the Father’s Day celebration at our school Share memorable moments with your child at our ...
14/06/2024

Fathers are invited to attend the Father’s Day celebration at our school Share memorable moments with your child at our school.

Yesterday we celebrated the first day of students of grade 1st - 8th CBSE and 9th -10th SSC of their new academic year w...
11/06/2024

Yesterday we celebrated the first day of students of grade 1st - 8th CBSE and 9th -10th SSC of their new academic year with a grand program. Firstly they were welcome by their respective coordinators followed by the assembly and then class activity. Teachers has arranged various culture program like dance, music etc. Vijayalaxmi Manerikar mam was today's chief guest. Risham Roy of grade 9th and Swamini of grade 10th share their beautiful thoughts of their journey in this school. Later Director mam encourage our students with their valuvable words. The program was ended with Vande Mataram.

Admission Open for New Session 2024-25Global Vision International School Address :- Gut.23/1, Behind Indoline Furniture,...
11/06/2024

Admission Open for New Session 2024-25

Global Vision International School Address :- Gut.23/1, Behind Indoline Furniture, Flora Town, Ambad Gaon Road, Ambad.

Contact No :- (0253) 2382800, 2382900,
Mob- 7770077014

Email id :- [email protected]
Website : www.globalvisionnasik.com

ग्लोबल व्हिजन स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपणदरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकत...
06/06/2024

ग्लोबल व्हिजन स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण

दरवर्षी ५ जून हा दिवस पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान आणि त्यामुळे मानवी जीवनाला असह्य तापमानाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. म्हणूनच या जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ग्लोबल व्हिजन स्कूलच्या क्रीडांगणाच्या चौफेर वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी डॉ. अंजली कुलकर्णी, संस्थेच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरिकर इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आदरणीय पालक , जे पालक इयत्ता १ ली साठी  RTE अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या पालकांनी RTE प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने ...
06/06/2024

आदरणीय पालक ,

जे पालक इयत्ता १ ली साठी RTE अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या पालकांनी RTE प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरला असेलच.

तुम्ही दिलेल्या पसंती क्रमानुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून १ किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील मुलांना प्रवेश देताना अनुदानित शाळा , शासकीय शाळा/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयमंअर्थसहाय्य शाळा असा प्रवेशासाठी चा प्राधान्य क्रम असणार आहेत. म्हणून पालकांना प्रथम प्राधान्य देताना अनुदानित शाळा - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा - स्वयं अर्थसहाय्य शाळा अशी निवड करावी.

विद्यार्थ्यांच्या निवास स्थानापासून १ किलोमीटर च्या अंतरावर अनुदानित शाळा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा/शासकीय शाळा नसतील व स्वयं अर्थसहाय्य शाळा असेल तरच अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्य शाळेत मुलांना २५ टक्के अंतर्गत सोडत पद्धतीने प्रवेश दिला जाईल.

ग्लोबल व्हिजन शाळा बारा वर्षे पूर्ण करुन तेराव्या वर्षात पदार्पण करत आहे.  त्या निमित्त रेडीओ विश्वास 90.8  यावर  शाळेत ...
28/05/2024

ग्लोबल व्हिजन शाळा बारा वर्षे पूर्ण करुन तेराव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्त रेडीओ विश्वास 90.8 यावर शाळेत राबविलेल्या काही अनोख्या अनवट संकल्पनांविषयी सांगणार आहेत शाळेच्या संचालक विजयालक्ष्मी मणेरीकर. देविका या अत्यंत हुशार निवेदिकेने घेतलेली ही मुलाखत जरुर ऐका. तुमच्याकडे रेडिओ विश्वास ऐकायला येत नसेल तर त्याचे ॲप मोबाईल वर डाऊनलोड करून ऐकता येईल. धन्यवाद.

*सुटी नव्हे, शिकण्यात बदल* इंग्रजाच्या काळात त्याच्या (गैर)सोयीसाठी उन्हाळयाची सुटी घेण्याची प्रथा सुरू झाली. न्यायालये,...
10/05/2024

*सुटी नव्हे, शिकण्यात बदल*

इंग्रजाच्या काळात त्याच्या (गैर)सोयीसाठी उन्हाळयाची सुटी घेण्याची प्रथा सुरू झाली. न्यायालये, प्रशासकीय कचेरी, शाळा यांतील कामकाज दीडदोन महिने बंद ठेवण्याची किंवा थंड ठिकाणी स्थलांतर करण्याची प्रथा पाडली गेली. आता त्या सर्वच क्षेत्रांत खूपखूप काम करण्याची निकड आलेली असताना, वर्षभरात उन्हाळी-हिवाळी-पावसाळी म्हणत दोनतीन महिने सुटी खाणे आपल्याला परवडणार नाही. चालू उन्हाळयात, शाळेच्या लोकांनी मुलांना शाळेत बोलावून त्यांचे अभ्यास घ्यावेत, असा एक फतवा राज्य सरकारने काढला. तथापि इतर अनेक सरकारी फतव्यांचे जे होते, तेच याचेही झाले, - म्हणजे तो कुणी मनावर घेतलाच नाही. सुटी सुरू होण्यापूर्वी त्याविरुद्ध आरडाओरड झाली. परंतु निवडणुकांना प्राधान्य असल्यामुळे, इतर वेळी पोरांना हुंदडण्यासाठी दामटून आपल्या कामाला लागतात; तसेच याही वर्षी झाले.

सरकारने काय करायचे, ते त्याच्या मगदुराप्रमाणे केले. पण पालकांनी, शेजाऱ्यांनी, गल्लीतल्या-सोसायटीतल्या काका-काकू वा आजी-आजोबांनी, निवृत्तीवेतन खात पडलेल्या माजी शिक्षकांनी, मुलांसाठी-किशोरवयीन मुला-मुलींसाठी या सुटीत काय केले? - याचे उत्तर आशादायक नाही. वार्षिक परीक्षा किंवा परीक्षण संपल्यावर मुलांना मनाचे, बुद्धीचेही एक `सुटलेपण' असते. स्वाभाविकपणे तेही उपभोगू द्यायला हवे. पण सुट्टी म्हणजे मोकाट उपद्रव घडावा यात मोठ्यांचा पोक्तपणा तरी कोणता? मुलांना मोकळेपण देत त्यांना गुंतवून ठेवणे हे काम सोपेे नाही; तसे ते फार कठीण आहे असेही नाही. परंतु त्या बाबतीत आपल्यात फारसा कुणी विचारच करीत नाही हे दु:खद आहे.

`मामाच्या गावाला जाऊया' हे कल्पनारम्य गीत पन्नास वर्षांपूर्वीचे आहे. आजच्या काळात `तो गाव' स्वप्नातही शिल्लक नाही, धुरांच्या रेषा हवेत काढणारी झुकझुक गाडीही नाही. बऱ्याच कुटुंबांत मामा-आत्या नाहीत. त्या काळात या भाचरांना सुटीत खूपसे शिकायला मिळत होते. मामीच्या हाताखाली रोजरोज शिकरण-पोळी करायचा सराव मिळत होता. आज त्या जागी `व्यक्तिमत्त्व विकास' नावाची खुळी शिबीरे पुरेशी आहेत काय? एके काळी उन्हाळी सुटीत पोहायला शिकणे अनिवार्यच होते. पोहायला न येणारा मुलगा म्हणजे अगदीच `हा'. पोहण्यातला खेळ बाजूला ठेवला तरी वेळप्रसंगी कुठे पडला तर पोहता यावे. आता गावोगावी स्थिती अशी आहे की, पोहायला पडायचे म्हटले तरी कुठे पाणी नाही. एखादी विहीर उपलब्ध असलीच तर त्यात, दात घासत उतरणारी, साबण चोपडणारी आेंगळ प्रजा इतकी असते की आपल्या मुलाला त्यात उतरविण्याचे धाडस नको. पुढच्या आयुष्यात पोहण्याचा प्रसंग येतच नाही..

हे दिवस बदलले तरी बदलत्या दिवसांतही मुलांना रमविणे, रिझवणे आणि त्यांतून जीवनशिक्षण देणे हे अटळ आहे. त्यासाठी पूर्वी कुटुंबातल्या मोठ्यांना वेळ होता, आता तो मुद्दाम काढावा लागेल. शिक्षकांचे आणि कार्यक्षम निवृत्तांचे तर ते कर्तव्यच आहे. `मुले ऐकत नाहीत...' ही सबब आहे; `मुले अनुकरणशील असतात' हे सत्य आहे. आपापल्या कोषांत दंग राहण्याने मुले मोकाट राहतात. ती ऐकत नाहीत, कारण त्यांना कोणी स्वत:च्या उदाहरणातून शिकवतच नाही. मुले स्वत:हून बिघडत नाहीत, त्यांना घराघरांत बिघडवले जात आहे. त्यांना टीव्हीवर कार्टून बघण्यापेक्षा आई-आजोबांशी खेळायला आवडते, हे बालसंगोपनशास्त्राने सांगितले आहे. परंतु नातवंडांना `व्यक्तिमत्त्व फुलविण्यासाठी' गुंतवून आपण लोळत पडणाऱ्या आयांनी, आणि सेकंड हनीमूनला किंवा अकरा मारुतीला जाणाऱ्या ज्येष्ठांनी मुलांची सुटी वाया घालवल्यासारखीच आहे.

उन्हाळी-हिवाळी सुटीत मुलांच्या शाळेचा अभ्यास घ्यावा, असे कोणीच म्हणत नाही. उलट शाळेतल्या गणित-विज्ञानाच्या प्रमेयांना पूरक असलेली व्यवहारिक समीकरणे त्यांना जुळविता आली पाहिजेत. एखाद्या घरगुती समारंभात सगळया गोष्टींसाठी पैसे फेकण्याची रीत इतकी बोकाळली आहे की, साध्या-सोप्या-घरगुती गोष्टी मुलामुलींना करता येईनाशा झाल्यात. दहावीस जणांची पंगत वाढणे, चार घागरी पाणी भरणे, अंथरुणे नीट घालणे काढणे यांसाठी घरची पिढी पुढे येत नाही. दिवसमान बदलले तर रिवाज बदलतील, साधने बदलतील.... पण त्यामागचे हेतू, भावना, प्रयत्न यांच्यात बदल होण्याचे कारण नाही. मामाच्या गावी आंबराई नाही, त्यामुळे झाडावर चढताच येत नाही हे एकवेळ समजून घेऊ पण क्रॅल्शियम कार्बाईडची पावडर टाकून आंबे कसे `पिकवतात' हे प्रात्यक्षिक दाखवायला हवे. सार्वजनिक स्वच्छता, श्रमदान, एखादी बैठक किंवा चर्चासत्र हाताळण्याचा सराव, संवादकौशल्य, वाहूतक नियमन, असे कितीतरी विषय मुलांपर्यंत पोचले पाहिजेत. बाजारात जाताना दोन अपत्ये आणि बायकोचे गाठोडे दुचाकीवरून नेऊन चुकीच्या जागी गाडी लावणारे प्रौढ, मुलांना कसचे शिकवणार? कुठेही-कधीही एखाद्या बोळकांडीत क्रिकेटचा डाव मांडणाऱ्या धगुडर््यांनी मुलांना खरे-शास्त्रशुद्ध क्रिकेट शिकविले पाहिजे, ते कोण शिकविणार? - मग पोरंही कुणाच्या तरी भिंतीवर तीन रेघोट्यांच्या स्टंपा करून प्लॅस्टिक चेंडूने दुसऱ्याच्या तावदानावर सिक्स मारतात. आज कुठेही जी मुले खेळताना, ओरडताना दिसतील; त्यांच्याजवळ त्यांना `शिकविणारा' कुणी प्रौढ कधी पाहण्यात आहे काय?

कुठे रस्त्याचे-पुलाचे बांधकाम, गावाबाहेरचा गोठा, ग्रंथालय, आकाशवाणी केंद्र, बसस्टँडचे कामकाज, तुरुंग, शूटिंग, बँक-पोस्ट, साखर कारखाना, फाऊंड्नी, रोपवाटिका, गुऱ्हाळ... शेकडो प्रकारचे शिक्षण मुलांना सुटीत देता येईल. त्यासाठी मुलांकडे जिज्ञासा आहे, पण मोठ्यांना ती सहेतुक पुरविता येत नाही. `धावपळीच्या जीवनात सवड नसते...' वगैरे थापा आता जुन्या झाल्या, त्यांचा उपयोग नाही. मुलांच्या `शिक्षणा'साठी सवड नसेल तर मग मुले बिघडली, मुले ऐकत नाहीत इत्यादी रडगाण्यात अर्थ नाही. एक-दोन अपत्यांच्या तीन-चार कुटुंबांनी त्यासाठी एकत्र यायला हवे. नवरा-बायकोची एक जोडी अशी पाच-सात मुले सहज हाताळू शकेल व आळीपाळीने ते काम सुलभ करता येईल.

उपाय व पर्याय खूप निघतील, मुळात एक गोष्ट स्पष्ट आहे की, मुलांना `चांगले' शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी होऊ शकत नाही, ती पालकांनी व समाजाने घ्यायला हवी. सरकार चांगले असेल तर ते चांगली शाळा काढेल, चांगला पगार देईल. `शिक्षण' मिळण्यासाठी त्याहून वेगळे काही लागते. ते सरकारकडे नाही. म्हणूनच उन्हाळयाची, हिवाळयाची किंवा कोणतीही सुटी ही `सुटी' नव्हे असेच मानले पाहिजे - पोरांनी, आणि थोरांनीही!! कारण पुढचा काळ मुलांचा असतो, त्यांना शिकण्याच्या संधी हव्यात.

*हा आनंदी उन्हाळा तुमच्यासाठी*

💐💐💐💐💐💐

https://www.globalvisionnasik.com/ Our Website is Live again... Please visit the Website and Observe our school policies...
09/05/2024

https://www.globalvisionnasik.com/

Our Website is Live again... Please visit the Website and Observe our school policies and activities 🙏 Share to those parents who are looking for good school for their child...

Mentor each child to be an inspiring and achieving child who is known and heard in and out of the classroom and challenged, supported in growing as an Ideal Citizen to the Nation contributing to be Great Leaders, Administrators, Scientists, Professionals, Entrepreneurs, and ultimately Ideal Families...

Address

Near Indoline Furniture, Flora Town, Ambad Gaon Road, Ambad
Nashik
422010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Global Vision International School, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Global Vision International School, Nashik:

Videos

Share


Other Nashik travel agencies

Show All

You may also like