21/11/2017
योग , व्यायाम , आहार आणि आरोग्य
गुणकारी ऊस व उसाचा रस….
‘कावीळ’ ह्या रोगावर वैद्यकीय उपचारां
सोबतच काही ‘बाहेर’ चे उपचारही
केले जातात. मात्र, आपण आवडीने
खात असलेला ऊस हा ह्या रोगा वरील
अत्यंत गुणकारी उपाय आहे !
कावीळची बाधा झालेल्या रुग्णाने
आठवडा भर रोज एखाद -दोन ऊस
चाऊन खाल्ले अथवा३ - ४ ग्लास
उसाचा रस पिला तर रक्त तयार
होण्याची क्रिया चालू होऊन रुग्ण
ठणठणीत बरा होतो.
ताज्या गुळवेली च्या रसा मध्ये २० ग्रॅम
खडी साखर मिसळून त्याचे सेवन
केले तरीही कावीळ बरी होते.
ऊस खाण्या मुळे लघवी साफ होते.
तसेच लघवी च्या वेळी आग होत
असल्यास ही तो गुणकारक ठरतो.
आम्लपित्त वाढलेल्यां नी ऊस
खाल्ल्यास अथवा ऊसाचा रस
पिल्यास पोट त्वरित साफ होते.
तसेच ऊस जेवणा पूर्वी खाल्यास
पित्त वाढ होत नाही.
***** ***
ऊस गोड लागला म्हणून मुळा पासून
खाऊ नये, अशी म्हण प्रचारात असली
तरी आयुर्वेदा नुसार तो मुळा पासून
औषधी आहे.
औषधी गवतांची जी पाच तृणमुळे
सांगितले ली आहेत त्यामध्ये ईक्षु
म्हणजे ऊसाच्या मुळांचा समावेश
केला आहे.
ही तृण पंच मुळे थंड, लघवीच्या,
किडनी च्या विकारां वर उपयुक्त आहेत.
ऊस हा गवता चाच आधुनिक प्रकार
(Modified)आहे.
ऊसाने महाराष्ट्राचे अर्थकारण आणि
राजकारण समृद्ध केले आहे.
ऊस हा बुडख्या जवळ जास्त गोड असतो.
शेन्ड्याकडे खारट होत जातो.
ऊसा च्या मुळां प्रमाणेच ऊसाचा रस
अतिशय औषधी आहे.
ऊसाचे करवे चावून चोखलेला ऊसाचा
रस हा यंत्राने काढलेल्या रसापेक्षा
जास्त श्रेष्ठ आहे.
यंत्राने रस काढताना तो स्वच्छ करून,
कीड, माती इ. काढून रस काढला जाईल
याची खात्री नसते.
तसेच ऊसाचा ताजा रस जास्त श्रेष्ठ आहे.
ऊसाचा रस बराच वेळ तसाच ठेवला
असता हवा, माशा इ. च्या संपर्का मुळे त्यात
विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.
गोड असूनही सर्वात कमी कॅलरी असणारे
हे नैसर्गिक शीतपेय आहे.
(आयुर्वेदात स्पर्शाला थंड या अर्थाने
शीत हा शब्द वापरला नाही,
तर पचना नंतर शरीरात दिसणारा गुणधर्म
या अर्थाने आहे.)
ऊसाचा रस, शहाळे, लिंबू सरबत, आवळा
सरबत, कोकम सरबत, इ. नैसर्गिक शितपेये
असताना आपण उगाचच कृत्रिम,
हानिकारक शितपेये पितो.
ऊसाचा रस गोड, पचायला जड,
थंड सांगितलेला आहे. बल्य, तत्काळ
शक्ती देणारा, तरीही कमी कॅलरी
असणारा आहे.
वजन कमी करू इच्छिणा-यांसाठी हे उत्तम
पेय आहे. मधुमेह असणा-या व्यक्त्तींना
साखरे ऎवजी ऊसाच्या रसाचा पर्याय
चांगला आहे.
मात्र त्यांनी रस प्रमाणात घेणेच उत्तम.
काविळी वर ऊसाच्या रसाचा खूप
उपयोग होतो.
रक्तपित्त विशेषत:
उन्हा ळ्या त घोळाणा फुटणे यावर
याचा उपयोग होतो.
ऊसाचा रस वृष्य सांगितलेला आहे.
तो कामोत्तेजक आहे.
किडनीचे आजार विशेषत: मूत्राघात म्हणजे
मूत्राची निर्मिती कमी होणे,
मूत्रकृच्छ्र म्हणजे लघवी साफ न होणे
यावर ऊसाच्या रसाचा खूप चांगला
उपयोग होतो.
ऊसाचा रस मूत्रल आहे,
लघवीचे प्रमाण वाढविणारा आहे.
पंचकर्मा तील वमन कर्मा साठी आकंठ
पेयपाना साठी इतर पदार्थां प्रमाणेच
ऊसाच्या रसाचा उपयोग करतात.
शरीरातील दूषीत कफ वमनामुळे
निघून जातो.
आयुर्वेदात ऊसाचे अनेक प्रकार
वर्णन केलेले आहेत.
त्यांचे गुणधर्मही कमी अधिक प्रमाणात
सारखेच आहेत.
ऊसापासून काकवी, गूळ, साखर,
खडीसाखर, मद्य, इ. पदार्थ तयार करतात.
त्यांचेही सविस्तर गुणधर्म आयुर्वेदात
वर्णिलेले आहेत.
शीघ्रकोपी, संतापी, साक्षात
पित्त प्रकृती असणा-या भोळ्या शंकराच्या
अभिषेका साठी दुधा प्रमाणेच थंड
ऊसाच्या रसाचा का उपयोग
करतात हे आता लक्षात येईल.
****
शक्तिवर्धक ऊस
ऊस हा पोएसी कुलातील असून त्याचं
शास्त्रीय नावं सॅकॅरम ऑफि सिनॅरम
असं आहे.
याचं मूळ स्थान आग्नेय आशियात मानलं
जातं होतं पण ब्रँडेस यांनी सर्व प्रकारची
माहिती मिळवून न्यू गिनी हे उगम स्थान
निश्चित केलं आहे.
ऊसही बहु वर्षायू वनस्पती असून
सुमारे ६ मीटरपर्यंत वाढते.
अशा या उसाची गोड चव सगळ्यां च्याच
आवडीची असते.
फक्त चवीला मधुर असणं हा एकमेव
गुण त्यात नाही तर आरोग्याच्या
दृष्टी कोना तूनही कित्येक चांगले
गुणही त्यात आहेत.
लघवीचा त्रास होत असेल तर ऊसाचा
रस प्यावा.
तसंच लघवीच्या ठिकाणी आग होत
असेल तरीही ऊस उपयुक्त आहे.
कावीळ झाल्यास जेवणा पूर्वी
ऊस चावून खावा.
चार- पाच दिवसांत प्रकृतीत सुधारणा होते.
घसा खवखवत असेल किंवा ताप
असेल तर ऊसाचा रस हितकारक आहे.
कर्करोग असणा-यांनी
ऊसाचा रस प्यावा.
कारण ऊसाच्या रसात
अल्कलाइन असतं.
या अल्कलाइन मध्ये रोगाशी
लढण्याची शक्ती असते.
ऊसाचा रस शरीराला ग्लुकोज
पुरवण्याचं काम करतो .
त्यामुळे शरीराला ग्लुकोजची
कमतरता जाणवते तेव्हा ग्लुकोज
पुरवण्याचं कामं ऊस करतं.
ऊसाच्या या गुणामुळे हे फळ शक्ति
वर्धकही मानलं जातं.
एखादं शारीरिक काम जास्त झालं
असेल किंवा उन्हात दगदग झाली असेल
तर ऊसाचा रस प्यावा.
प्रोटीनची कमतरता असलेल्यांनी
उसाचा रस हमखास प्यावा.
संसर्गा पासून ऊस तुमचा बचाव करू
शकतो कारण त्यात अँटि ऑक्सिडंट
असतं. तसंच रोग प्रतिकार शक्ती
वाढवण्या चं कामही ऊस करतो.
ऊस पाचकही आहे.
****
‘‘ उंच वाढला एरंड,
परि का होई इक्षुदंड |’’
असं वर्गात ल्या सतीशला बाई म्हणाल्या
आणि मी घरी जाऊन लगेचच आईला
या म्हणीचा अर्थ विचारला होता.
त्यावर आईनं मला इतकी उदाहरणं
दिली आणि म्हणीचा अर्थ समजाऊन
सांगितला की ती अद्याप माझ्या
लक्षात राहिली.
आज ऊसावर काही लिहावं असं
वाटलं आणि त्या म्हणीची, पर्यायानं त्या
दिवसाची आठवण झाली.
तर असा हा उभा वाढणारा ऊस.
निरनिरा ळ्या देशात आपली
वेगवेगळी रुपं दाखविणारा.
इतिहास पाहिला तर अरबांनी हे
पीक आठव्या शतकात आपल्या कडे
आणलं.
बघता बघता ते इजिप्त, दक्षिण आशिया,
आफ्रिका, पोर्तुगाल, पुढे ब्राझिल, चीन,
थायलंड, पाकिस्तान, अमेरिका- मेक्सिको,
कोलंबिया, तसेच ऑस्ट्रेलिया,
फिलिपाईन्स असं सगळ्या जगात पसरलं.
हे झाड ५- ६ हात उंच होते.
ऊसात पांढरा, तांबडा, काळा, पुंड्या
वगैरे काही जाती आहेत.
तांबड्या ऊसाचा रस फार गोड असतो.
तो थंड असून लघवी साफ होत नसेल
तर उपयोगी पडणारा आहे.
तर काळा ऊस हा जास्त दाहनाशक आहे.
बेडा ऊस हा औषधे निर्माण
करण्यास उपयोगी पडतो.
ऊसाचा मुळा कडील भाग गोड असतो.
मधला भागहा मध्यम तर शेंड्याला
तो किंचित खारट असतो.
ऊसा च्या झाडाचा कुठला च भाग
वाया जात नाही. ऊसाची मुळे व
शेंडे गुरांना खायला देतात.
तसेच रस काढून झाल्या वर
जी चिपाटी उरतात तीही गाई- म्हशी
खातात व जाळायलाही ती उपयोगी पडतात.
ऊसाचे कांड हातात धरून दातानं
त्याची सालं काढायची आणि रस
चोखून प्यायचा ..!
वा ! ही गंमत काही
न्यारीच होती.
त्यात तो जर चरकावर काढला आणि
त्यात लिंबाचा रस व बर्फ घातला तर …
ती मजा आणखीनच जास्त!
ऊसाचा रस, गौरब, गौरपा, पापेलोन, असिर,
असब, गन्ना शरबत, मॉस्तो,
शेरडीनो रस अशी या रसाला
आपल्या कडे असंख्य नावे आहेत.
ब्राझील सारख्या देशात ऊसा पासून दारू
बनवितात तर आपल्या कडे काकवी,
गूळ, पिठीसाखर, खडीसाखर,
साधी साखर मिळवितात.
ऊसाचा रस आटवून त्या पासून
काकवी मिळते. पुढे तो जास्त आटवून
घट्ट होऊ देतात.
त्या रसाला आकार देतात
त्याला गूळ व गुळाची ढेप असे नाव
आपण देतो. हाच ताजा रस स्फटिक रुपाने
आपल्या समोर येतो, ते साखर हे नाव घेऊन.
कोलंबिया तसेच अमेरिकेतही रसातील
सक्रोज व फ्रक्टोज या साखर्या
मिळविण्या साठी रस आटवितात.
या घट्ट व भरीव साखरे ला पानेला
असे म्हणतात. पदार्थ व थंड पेये गोड
करण्या साठी याचा वापर केला जातो.
ऊस सम शितोष्ण आहे.
रस थंड पण गूळ उष्ण आहे.
म्हणूनच उन्हाळ्या च्या दिवसात रस
पिण्याची आपल्याकडे पद्धत आहे.
साधारण पणे तो मधुर, वातकर,
स्निग्ध व बलकर आहे.
उसाने कांति उजळून येते.
उसाचा रस हा सारक आहे.
तो दाह कमी करणारा,
मधुर, व गुरू आहे.
नवा गूळ हा पित्त व रक्तविकार
वाढविणारा, कफ- वाताचा नाश करणारा
असा आहे.
एक वर्षाचा जुना गूळ हा जास्त
गुणकारी असतो.
ज्यांचा घसा दुखत असेल, सर्दी- कफ
झाला असेल त्यांनी आले घालून
(बिन बर्फाचा) रस प्यावा.
पुष्टि व तुष्टि वाढविण्या साठीही रसाचा
उपयोग केला जातो. काविळी वर व की
लागलेली असल्या सही रस
प्यायला द्यावा. ऊसाचा रस अल्कलाइन
असल्याने स्तन व पौरुष ग्रंथीचा कर्करोग
टाळण्या साठी फायदेशीर ठरतो.
जे सतत अग्निजवळ काम करतात वा
शारीरिक श्रमाचे काम करतात,
अशा व्यक्तींनी ऊसाचा रस
नियमित पणे प्यावा.
रसात कर्बोदके विपुल प्रमाणात
असल्याने रस प्यायल्या बरोबर उत्साह
व ऊर्जा वाढतात.
बाजारात मिळणारी शीतपेये पिण्या पेक्षा ताजा रस
नक्कीच किफायत शीर व
आरोग्यदायी असतो.
ताज्या रसात कर्बोदकां बरोबर खनिजे-
फॉस्फोरस, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम,
पोटॅशियम असतात.
एवढे सगळे गुण उसात असल्यानेच
वर्गात सतीशला बाई ‘‘एरंड’’ असे
का म्हणाल्या ते समजले असेलच.
आता या ऊसाचे आहारात कसे उपयोग
करायचे तेही पाहू.
१) ऊसाच्या गुर्हाळात जाऊन
ताजा रस काढून घ्यावा
व लिंबू टाकून प्यावा.
(बाहेरचा बर्फ घालू देऊ नये.)
२) शेतावरील गुर्हाळात काकवी च्या
बरोबर तांदळाची भाकरी वा पोळी
खावी व मजा घ्यावी.
येथेच आपल्या ला ताजा गूळही
खायला मिळेल. म्हणूनच एक सहल
ऊसाच्या शेतावर जरूर काढावी.
३) ऊसा पासून बनविलेला गूळ व साखर,
खडीसाखर व पिठीसाखर आपण रोजच्या
स्वयंपाकात वापरतोच.
४) रसाच्या पोळ्या- कणीक
भिजविता नाच त्यात तेलाचे मोहन,
मीठ व उसाचा ताजा रस घालावा
व कणिक मळावी.
अर्ध्या तासाने नेहमी सारख्या पोळ्या
भाजाव्यात व वर तूप लावून गरम
गरम खाव्यात.
या पोळ्यांना तोंडी लावायला
काहीही नसले तरी चालते.
५) रसाचे काजू घातलेले सरबत –
काजू मिक्सर वर बारीक दळून घ्यावेत.
त्यात ताजा रस, पाणी व खडीसाखर
घालून चांगले वीस मिनिटे उकळावे.
नंतर गार झाल्यावर गाळून फ्रिज मध्ये
थंड करावे व मग प्यायला द्यावे.