Zenith Trek Diaries

Zenith Trek Diaries It is non profit organization with group of people from different parts of city having intrest in trekking and exploring places around pune @ very low cost
(13)

सह्याद्रीच्या कुशीत मुक्काम!शनिवार, ९ डिसेंम्बर!जमिनीखाली १०० फूट खोल भुईसुळा गुहा, पाचगणी धबधबा, टेंट कॅम्पिंग, जंगल ट्...
07/12/2023

सह्याद्रीच्या कुशीत मुक्काम!
शनिवार, ९ डिसेंम्बर!

जमिनीखाली १०० फूट खोल भुईसुळा गुहा, पाचगणी धबधबा, टेंट कॅम्पिंग, जंगल ट्रेल आणि ड्रोन शूटिंग.⛰️🌱🪱🌌🚣‍♂️

अधिक माहितीसाठी संपर्क करा🙏

रिबीन!भगव्या रंगाची दिसणारी ही रिबीन, साधीसुधी रिबीन नाहीये मित्रांनो. पावसाळा उंबरठ्यावर असताना अखंड महाराष्ट्रातून हजा...
09/07/2023

रिबीन!

भगव्या रंगाची दिसणारी ही रिबीन, साधीसुधी रिबीन नाहीये मित्रांनो. पावसाळा उंबरठ्यावर असताना अखंड महाराष्ट्रातून हजारो पर्यटक निसर्ग प्रेमापोटी अभेद्य सह्याद्रीच्या कडेकपारी, किल्ले आणि घाटवाटा पालथ्या घालतात.

छत्रपतींच्या स्वराज्यात सह्याद्री, राजाचा आणि प्रजेचा, दोघांचाही एक सच्चा सोबती होताच. पण सह्याद्रीच्या कडेकपारी ज्यांच्यासाठी अनोळखी आहेत, त्यांना ह्याची जाण ती कुठली?

मग भटकंती करत असताना अशे कित्येकजण नकळतपणे आपली वाट चुकतात आणि मग त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी अनेक दुर्गवीरांना, संस्थांना, पोलिसांना आपले जीव धोक्यात घालावे लागतात.
अशा वेळी कामी येतात, त्या म्हणजे ह्या रिबीन. त्यामुळे जर आपण सह्याद्रीमध्ये भटकंती करत आहात, तर अशा भगव्या रिबीन वाटेवर झाडांना बांधून पुढे मार्गक्रमण करावे, म्हणजे तुम्ही वाट चुकणार नाही. भगवा हा त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे, म्हणून भगवी रिबीन मित्रांनो. त्या रिबीन तुम्हालाच नाही, तर ईतर हजारो भटकंतीवीरांना योग्य वाट दाखवण्यास मदत करणार आहेत.

ज्या संस्थांनी, गिर्यारोहकांनी आणि सह्याद्रीपुत्रांनी अशा रिबीन लावून तुम्हाला योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना आणि सह्याद्रीला गुरू मानून ह्याच भगव्याच्या साक्षीने प्रजेच्या हितापोटी सुराज्य निर्माण करणाऱ्या महाराजांना मानाचा मुजरा!

चांगभलं🌹

मोहन ज. शेलार, आसनी (जावळी, सातारा).

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zenith Trek Diaries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zenith Trek Diaries:

Share

Category

Nearby travel agencies


Other Tour Agencies in Pune

Show All