Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो

  • Home
  • India
  • Pune
  • Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो

Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो आयुष्याला पाने चारच - Arts, Commerce, Science आणि 'उनाडक्या'..!! ❤️

१ मे - महाराष्ट्र दिनाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🥳🎉        ❤️
01/05/2024

१ मे - महाराष्ट्र दिनाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🥳🎉



❤️

श्रीरामजन्माचा समयविशेष वर्णन करणारा श्लोक -संप्राप्ते कुसुमाकरे सिततिथौ चैत्र्यां नवम्यां दिवामध्यस्थे मिहिरे पुनर्वसुग...
17/04/2024

श्रीरामजन्माचा समयविशेष वर्णन करणारा श्लोक -

संप्राप्ते कुसुमाकरे सिततिथौ चैत्र्यां नवम्यां दिवा
मध्यस्थे मिहिरे पुनर्वसुगते चन्द्रे रवेरन्वये ।
सम्भूतोऽमरसंस्तुतोऽसुररिपुर्धर्मावने दीक्षितः
तं श्रीशं विहितावतारमनिशं रामाभिधानं भजे ॥

भावार्थ - ऋतुराज वसंत बहरला असताना चैत्र शुद्ध नवमी या दिवशी, सूर्य मध्याह्नी आणि चंद्र पुनर्वसु नक्षत्रांत स्थिरावला असता, सूर्यकुळामध्ये, समस्त देववृंदाद्वारे स्तविला आळविला गेलेला, अधर्मी असुरांचा कर्दनकाळ, धर्मरक्षणासाठी सदैव तत्परतेने नानाविध अवतार धारण करणारा,जो 'राम' हे नाम धारण करून पुन्हा अवतीर्ण झाला अशा त्या लक्ष्मीपती श्रीनारायणाला मी भजतो.

रचना - प्रणव प्रदीप गोखले

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉कोणाचे काही नववर्ष रिझोल्युशन्स??    ❤️
09/04/2024

हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉

कोणाचे काही नववर्ष रिझोल्युशन्स??

❤️

Only a few seats available in Batch 2 : 30th-31st March
27/03/2024

Only a few seats available in Batch 2 : 30th-31st March

The Border Roads Organisation (BRO) connected the strategic Nimmu-Padam-Darcha road in Ladakh on Monday (March 25).This ...
27/03/2024

The Border Roads Organisation (BRO) connected the strategic Nimmu-Padam-Darcha road in Ladakh on Monday (March 25).
This 298-km road will connect Manali to Leh through Darcha and Nimmu on Kargil – Leh Highway. The road is now the third axis apart from Manali-Leh and Srinagar-Leh, which connects Ladakh to the hinterland.
The Nimmu-Padam-Darcha road derives its strategic importance from the fact that it is not only shorter vis-a-vis the other two axes, but crosses only one pass; Shinku La (16,558 feet) on which tunnel work is about to commence by the BRO.

Courtesy: India Today and

24/03/2024
माघी गणेश जन्मोत्सव 🙏🏻🎉                                                            ❤️
13/02/2024

माघी गणेश जन्मोत्सव 🙏🏻🎉
❤️

13/02/2024

Incredible Sighting of Dolphins At Vijaydurg, Maharashtra | Unadkya.com | | Dec 2020

09/02/2024

Living Root Bridge, Mawlynnong, Meghalaya | Unadkya.com | Oct'19

"Unadkya Star Party"How would you like a night filled with clear skies and a thousand stars, far far away from the city?...
08/02/2024

"Unadkya Star Party"

How would you like a night filled with clear skies and a thousand stars, far far away from the city?

How would you like seeing constellations and planets while listening to their fascinating stories?

How would you like an endless night of astronomic discussions around celestial events, the solar system, interstellar objects, where the sky is the limit - quite literally!

Here we come, with all this and more, with our collaborator and avid star gazer 'Omkar Dhayagude'.

And if you are wondering how the day will go, the beaches and temples of Kokan are waiting for us.

Wouldn't you say this is a match made up above? Why wait then? Come along...

For More Details, Contact :
Pratik - 9420213309
Unadkya.com

Unadkya Star PartyHow would you like a night filled with clear skies and a thousand stars, far far away from the city?Ho...
05/02/2024

Unadkya Star Party

How would you like a night filled with clear skies and a thousand stars, far far away from the city?

How would you like seeing constellations and planets while listening to their fascinating stories?

How would you like an endless night of astronomic discussions around celestial events, the solar system, interstellar objects, where the sky is the limit - quite literally!

Here we come, with all this and more, with our collaborator and avid star gazer *Omkar Dhayagude.*

And if you are wondering how the day will go, the beaches and temples of Kokan are waiting for us.

Wouldn't you say this is a match made up above? Why wait then? Come along...

For More Details, Contact :
Pratik - 094202 13309

❤️

Amritsar - Dalhousie - DharamshalaAmritsar - Dalhousie - Dharamshala may seem to you, like your run-of-the-mill pilgrim ...
01/02/2024

Amritsar - Dalhousie - Dharamshala

Amritsar - Dalhousie - Dharamshala may seem to you, like your run-of-the-mill pilgrim tour. These locations however, have so much to offer, in addition to the Gurudwaras, Temples & Monasteries. Food for instance, for the region boasts of a rich culinary tradition. Or architecture from the colonial times that still stands strong and has witnessed some turning points in our history. And then there are the mountains of course. Glorious, magnificent Himalayas, that dwarf and humble you. It would be our absolute pleasure to take you on this tri-city journey and show you things that have enchanted us. Come along...

For more details, Contact :
Pratik - 094202 13309
Follow us on - Facebook | Instagram | Twitter | YouTube/unadkya

"भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा"       ❤️
26/01/2024

"भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा"



❤️

श्रीराम मंदिर अयोध्या येथे होणारा उद्याचा 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा तुम्ही कसा साजरा करणार आहात..?? #जयश्रीराम   🙏🏻
21/01/2024

श्रीराम मंदिर अयोध्या येथे होणारा उद्याचा 'प्राण प्रतिष्ठा' सोहळा तुम्ही कसा साजरा करणार आहात..??

#जयश्रीराम

🙏🏻

काही पत्रकार रोज पूर्ण फेसबुकवर राममंदिराच्या विरोधात कोण लिहितं याचा वास काढतात आणि शेअर करत राहतात. मग कविता असतील, ले...
18/01/2024

काही पत्रकार रोज पूर्ण फेसबुकवर राममंदिराच्या विरोधात कोण लिहितं याचा वास काढतात आणि शेअर करत राहतात. मग कविता असतील, लेख असतील, अव्याहतपणे शेअरिंग सुरू असते.

यात अनेक ठिकाणी बाबरी पाडून राम मंदिर उभे केल्याचे उल्लेख असतात. पण पुराव्यानिशी या पूर्ण प्रकरणाचे सत्य काय आहे! कोणी सतत शेण खाल्लं?

हे केके मुहम्मद सरांनी त्यांच्या भाषणात मांडले आहे. वाचा आणि आपल्या सर्कलमध्ये शेअर, फॉरवर्ड करत रहा. कम्युनिस्ट कशी भारताला लागलेली कीड आहे हे तुम्हाला समजेल.



#अयोध्या_राममंदिर

व्हिडीओमध्ये अयोध्येच्या राम मंदिराबाबत काय म्हटलं आहे ?

=> "दीप ज्योति परम ज्योति दीप ज्योति जनार्दन: दीपो हरतु मे पापं दीप ज्योति नमोस्तुते! या श्लोकाने भाषणाला सुरुवात.

=> श्रीलंका, बर्मा , थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, जपान अशा सर्वच दक्षिण आशियायी देशांमध्ये प्रभू श्रीरामांची पूजा केली जाते.

=> इंडोनेशिया आणि मलेशिया ही दोन्ही मुस्लीम राष्ट्र असून देखील ते रामाचा आदर करतात, रामाला पूजतात.

=> उर्दू कवी अलामा इक्बाल म्हणतात - है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़, अहल-ए-नज़र समझते हैं उस को इमाम-ए-हिंद

=> तीन प्रकारचे लोक आहेत. धार्मिक, डावे आणि पुरातत्त्व संशोधक. धार्मिक लोक प्रभू श्रीरामांचा हजारो वर्षांचा इतिहास सांगू शकतात, डावे/कम्युनिस्ट इतिहासकार म्हणतात असं काही अस्तित्त्वातच नव्हतं पण माझ्यासारखे पुरातत्त्व शास्त्रज्ञ असा विचार करत नाहीत. बीबी लाल सरांच्या हाताखाली मी शिकलोय. लाल सरांनी अनेक ठिकाणी उत्खनने केली आहेत. उदा. हस्तिनापुर, अयोध्या, चित्रकुट आश्रम ई.

=> हस्तिनापुरमध्ये उत्खनन करत असताना बीबी लाल यांना काही भांडी सापडली, याचा उल्लेख त्यांनी Painted Grey Ware असा केला आहे. लाल यांचं संशोधन इथे वाचायला मिळेल - https://goo.gl/RruVkE हस्तिनापुर नंतर अनेक ठिकाणी उदा. पुराना किला, पानिपत, तीलपत, बागपत, सोनीपतमध्ये त्यांनी उत्खनने केली आणि त्यांना समान भांडी सापडली.

=> हस्तिनापुरमध्ये ज्या इतर वस्तू सापडल्या त्यांचा संदर्भ वायुपुराण मस्त्स्यपुराणातदेखील सापडला.
'Gangay apahrite tsmin nagare Nagasahavaye Tyaktva Nichaksur nagaram Kausambyam sanivatsyati'
‘When the city of Nagasahvya (Hastinapura) is carried away by the Ganga, Nichakshu (the then ruler) will abandon it and dwell in Kausambi.’
निचक्षु राजाच्या कारकिर्दीत गंगा नदीला पूर आला होता आणि त्या पुरात हस्तिनापुर शहर वाहून गेलं. त्यानंतर या राजाने कौसंबी या ठिकाणी आपलं राज्य पुन्हा प्रस्थापित केलं. उत्खनन करताना हस्तिनापुरमध्ये पूर येऊन गेल्याचे पुरावे लाल यांना उपलब्ध झाले. अशा पद्धतीने त्यांनी कौसंबी या ठिकाणीदेखील उत्खनन केले. तिथे त्यांना सारखेच पुरावे मिळाले. अशा पद्धतीने पुरातत्त्व शास्रज्ञ काम करतात.

=> लाल यांनी अशाच पद्धतीने अयोध्येतदेखील उत्खनन केले आहे. १९७५-७६ मध्ये मी पुरातत्त्वशाखेचा विद्यार्थी होतो. त्यावेळी मशिदीतला प्रवेश सर्वसामन्यांसाठी बंद होता. पण आम्ही उत्खनन टीमचा भाग असल्याने आम्हाला प्रवेश मिळाला

=> आम्ही मंदिराचे black granite मधले एकूण १२ खांब बघितले. त्या खांबांवर पूर्ण कलश कोरलेले होते. पूर्ण कलश हे हिंदू धर्मात पवित्र चिन्ह मानले जाते. शंख, पद्म, मीन, मिथुन ही चिन्हे त्यावर कोरलेली होती. शिवाय काही देवी-देवतापण त्यावर कोरलेल्या होत्या. तुम्हाला पहायचं असल्यास समान बांधकाम कुतुब कॉम्प्लेक्समध्येपण पहायला मिळेल.

=>कुतुब कॉम्प्लेक्समध्ये कुव्वत-अल-इस्लाम मशीद आहे. शेकडो देवी देवता कोरलेल्या तुम्हाला दिसतील. जैन आणि हिंदू मंदिराचे अवशेष वापरून ही मशीद उभी केलेली आहे. - https://en.wikipedia.org/wiki/Qutb_Minar_complex

=> त्याकाळी जे घडलं त्याचा बदला आत्ता घ्या असं मी म्हणत नाही. तुम्ही हिंदू/मुस्लीम म्हणून न पाहता, या सर्व गोष्टींकडे सामान्य निरीक्षक म्हणून बघा तुम्हाला अशा अनेक गोष्टी दृष्टीस पडतील.

=> पूर्ण नालंदा, विक्रमशिला विद्यापीठ या बख्तियार खिलजीने खालसात काढले होते. मी या सर्व साईट्सवर काम केलेलं आहे.

=> मान्य करा या गोष्टी घडल्या आहेत आणि आता पुढे कसा मार्ग काढायचा, यावर विचार करा.

आता आपल्या पोस्टमधला महत्त्वाचा भाग सुरु होतो .. जो माझ्यासाठीदेखील नवीन आहे.

=> कम्युनिस्ट/डाव्या इतिहासकारांनी या सर्व दाव्यांचं खंडन केलं. तिथे अशी कोणतीही मंदिरे नव्हती, कोणतेही अवशेष सापडले नाहीत म्हणून आरडाओरडा सुरु केला. मी त्यावेळी चेन्नई मध्ये होतो.

=>इंडियन एक्स्प्रेसमध्ये मी लहानसा लेख लिहिला त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं कि, बीबी लाल यांच्या उत्खनन टीमचा मी भाग होतो. मी एकटा मुस्लीम शास्त्रज्ञ होतो.

=> मी सांगितलं मुसलमानांसाठी ज्या प्रकारे मक्का-मदिना पवित्र आहे त्याचप्रकारे हिंदूंसाठी अयोध्या महत्त्वाची आहे. मुस्लिमांनी अयोध्या हिंदुंच्या हवाले करायला हवी.

=> मी सरकारी नोकर होतो, कुणाचीही परवानगी न घेता मी लेख लिहिला. परवानगी घेतली असती तर लेख लिहिता आला नसता. माझं निलंबन झालं नंतर काही लोकांनी हस्तक्षेप करून ते रद्द केलं, पण मग माझी बदली झालीच.

=> इतिहासकारांचा एक कम्युनिस्ट गट म्हणत होता, मंदिराचे अवशेषच नाहीत तर दुसरा गट म्हणत होता कि मंदिराचे अवशेष आहेत. हा वाद सोडवण्यासाठी अजून एक उत्खनन केलं गेलं.

=> २००३ मध्ये असं उत्खनन केलं गेलं. पूर्वी फक्त १२ खांब सापडले होते पण यावेळी ५० खांबांचे बेस सापडले. म्हणजे तिथे प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर होतं यात शंका नाही. इतकंच नाही तर तिथे मकर प्रणालीदेखील सापडली. हिंदू धर्माप्रमाणे मकर प्रणाली गंगेचं प्रतिक आहे तर कासव प्रणाली यमुनेचं. मंदिराचे २६३ प्रकारचे अवशेष आम्हाला सापडले.

=> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला विष्णू हरी शिला फलक सापडला. The inscription is said to have been found among the debris of the Babri mosque in Ayodhya when a group of Hindu activists demolished the mosque in 1992. - https://en.wikipedia.org/wiki/Vishnu_Hari_inscription

=> एक पुरातत्त्व शास्त्रज्ञ या नात्याने मी ५००० वर्षे जुनं मंदिर आहे असा दावा करू शकत नाही पण मंदिर १२ व्या शतकातील असावं. त्यामुळे हिंदूंना ते परत मिळायला हवं.

=> मी अनेक मुस्लिमांशी आणि त्यांच्या संघटनांशी बोललो, त्यांची राम मंदिर handover करण्याची पूर्ण तयारी होती पण डाव्या आणि कम्युनिस्ट इतिहासकारांनी [रोमिला थापर, इरफान हबीब, ई.] मध्येच चुकीची आणि बेसलेस माहिती देऊन मुस्लीम समाजाची दिशाभूल केली.

=> या प्रश्नावर एकच तोडगा आहे आणि तो म्हणजे, मुस्लिमांनी राम मंदिर मुद्दा सोडायला हवा. हिंदूंना ती जागा परत मिळायला हवी.
-----------------------------------------------------------------

के के मुहम्मद सरांनी सांगितल्याप्रमाणे डाव्या आणि कम्युनिस्ट इतिहासकारांनी मध्ये खोडा घातला नसता तर हे प्रकरण चिघळलं नसतं. अर्थात वादाचं मूळ हिंदू किंवा मुस्लीम नसून विचारसरणी आहे. तीच विचारसरणी जिला हिंदू-देव, हिंदू-धर्म, भारत-देशाचा तिटकारा आहे! काहीच दिवसांपूर्वी डाव्या पोर्टल्सनी पुन्हा एकदा तिथे राम मंदिर नव्हतच या आशयाचा लेख प्रसिद्ध केला होता. जर मुस्लीम गटांची दिशाभूल केली नसती, दिलेल्या पुराव्यांवर वेळीच विश्वास ठेवला असता, देशाचा इतका वेळ वाया गेला नसता. इतक्या दंगली, एकमेकांविरुद्ध अपप्रचार, द्वेष निर्माण झाला नसता.

#सुचिकांत

(फोटोत डावीकडे बी बी लाल सर, तर उजवीकडे के के मुहम्मद सर)

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🎉🥳तिळगुळ घ्या - गोड गोड बोला..!! 😄😃       ❤️
15/01/2024

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!! 🎉🥳
तिळगुळ घ्या - गोड गोड बोला..!! 😄😃



❤️

  ला जाऊन ४-५ लाखांचा चुराडा करण्यापेक्षा त्यापेक्षा भारी   आणि   ला १.५-२ लाखात जाऊन या आणि उरलेल्या पैशांची   करा..   ...
10/01/2024

ला जाऊन ४-५ लाखांचा चुराडा करण्यापेक्षा त्यापेक्षा भारी आणि ला १.५-२ लाखात जाऊन या आणि उरलेल्या पैशांची करा.. तसंपण कधी लाखाच्या घरात जाईल काही सांगू शकत नाही..



❤️

1,2,3/366(Leap Year) - Badami Caves & Shakambhari Shakti Peetham, Banashankari Temple, Badami                           ...
03/01/2024

1,2,3/366(Leap Year) - Badami Caves & Shakambhari Shakti Peetham, Banashankari Temple, Badami


❤️

01/01/2024

Border Roads Organisation चा मान राखा.

हिमालयासारख्या अतिशय अवघड ठिकाणी रस्तेबांधणीचं अतिशय महान काम करणाऱ्या B.R.O. च्या Boards वर तुमच्या टुक्कार फडतूस Groups चे महाटुक्कार महाफडतूस Stickers अजिबात चिकटवू नका.. हा छपरीपणा ताबडतोब बंद करा..
B.R.O. चे Boards म्हणजे तुमच्या हमाल्या करणारी Marketing Agency नव्हे..

Border Roads Organisation चा मान राखा.





❤️

मंडळी,यावर्षीची एक आनंदाची बातमी सांगायची म्हटली तर २०२३ सालात लहान - मोठ्या Tours, Family तसेच Group Tours आणि Honeymoo...
31/12/2023

मंडळी,
यावर्षीची एक आनंदाची बातमी सांगायची म्हटली तर २०२३ सालात लहान - मोठ्या Tours, Family तसेच Group Tours आणि Honeymoon Tours अशा जवळपास ४० वेगवेगळ्या Tours आपण Unadkya.com तर्फे केल्या.
ज्यामध्ये प्रामुख्याने भारतातील Leh, Spiti Valley, Offbeat Kashmir, Uttarakhand, Himachal Pradesh, Assam, Meghalaya, Arunachal Pradesh, Sikkim, Karnataka, Kerala, Gujarat, Rajasthan, Madhya Pradesh, Goa, Orissa, Kokan, Lakshadweep, Andaman आणि भारताबाहेरील Nepal, Bhutan, Sri Lanka अशा अनेक Tours चा समावेश होता..

२०२३ मध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे Group Tours कमी प्रमाणात झाल्या हे अगदी खरं आहे पण ती भर २०२४ साली तुम्हाला Group Tours चे भरपूर Options देऊन नक्की भरून काढण्यात येईल.

आणि यावर्षीची म्हणाल तर ती म्हणजे ३ मुलींचा एक ग्रुप सप्टेंबर मध्ये ट्रिपसाठी आणि त्यांच्याच रिलेटिव्ह्सचा ७ जणांचा एक ग्रुप ऑक्टोबर मध्ये ट्रिप साठी भारतात आला होता. त्यांना त्यांच्या Wishlist नुसार Customised Tour Plan Unadkya.com मार्फत देण्यात आला.. It was a Win - Win for the उनाडक्या Team and The Korean Travellers..

तळटीप : आत्ता Christmas - New Year ला आयत्या वेळी Booking साठी पर्याय शोधताना तुमची झालेली धावपळ जर २०२४ च्या मार्च - एप्रिल - मे महिन्यातील सुट्ट्यांमध्ये व्हायला नको असेल तर आजच संपर्क करा..

प्रतिक - 094202 13309
Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो ❤️

08/12/2023

मंडळी,
आमच्या उनाडक्यांचे Updates पोहोचत नाहीत अशी ज्यांची तक्रार होती ती तक्रार दूर करण्यासाठी घेऊन येत आहोत UNADKYA. COM चे WhatsApp चॅनल..!!

खाली दिलेल्या Link वर Click करून आपल्या चॅनलला अवश्य FOLLOW करा.. आणि मिळवा उनाडक्याचे Regular Updates ते ही अगदी मोफत..!!😊❤️

❤️

https://whatsapp.com/channel/0029VaFzO08Dp2Q70LiSzd1x

06/12/2023

When in Dudhpathri, Do the Diskhal Trek ❤️



❤️

28/11/2023

वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेण्याच्या उनाडक्या ❤️





❤️

मंडळी, शुभ दीपावली 🎉        ❤️
12/11/2023

मंडळी, शुभ दीपावली 🎉



❤️

करूयात सीमोल्लंघन Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो संगे..दसऱ्याच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🎉🥳The name Andaman ...
24/10/2023

करूयात सीमोल्लंघन Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो संगे..

दसऱ्याच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा 🎉🥳

The name Andaman & Nicobar brings to mind stunning beaches with white sand and deep blue waters. It also harbours secrets from British India during the freedom struggle. The Andaman of today is culturally different to what it must have been in the last century. But its beauty is still enticing. And for those who want more, there also are a plethora of activities like scuba diving and water surfing for a fulfilling experience.
So if you haven't yet thought of Andaman this holiday season, do.. that you will end the trip on a happy high, is a promise.

For more details, Contact :
Pratik - 9420213309
Follow us on - Facebook | Instagram | Twitter | YouTube/unadkya

Day 8 - 18th August, 2023Nubra Valley to Pangong Tsoआज नुब्रा व्हॅलीतून पॅंगॉंगचा प्रवास होता. आमच्या ड्रायव्हर काकांनी ...
12/10/2023

Day 8 - 18th August, 2023
Nubra Valley to Pangong Tso

आज नुब्रा व्हॅलीतून पॅंगॉंगचा प्रवास होता. आमच्या ड्रायव्हर काकांनी काल रात्रीच फोनाफोनी करून कोणत्या ठिकाणी किती पाणी आहे, मधे कुठे दरड कोसळली आहे का वगैरे इत्यंभूत माहिती मिळवली होती.. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सकाळी एरवी पेक्षा थोडं लवकर ७.३० ला निघायचं ठरवलं होतं..

हॉटेल किचनमध्ये पण आदल्या दिवशीच लवकर ब्रेकफास्ट द्यायला सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बरोबर ७ वाजता तयारी करून ठेवली होती. आम्ही पराठे खायला सुरुवात केली आणि तेवढ्यात एका बॉंग मनुष्याने मोबाईल वर जोरजोरात Classical Music लावून एंट्री घेतली.. ४-५ मिनिटे दुर्लक्ष करून पण त्याच्या मोबाईलचा आवाज काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता.. आम्ही २-३ हाका मारल्या तरीही त्याला त्या ऐकू जात नव्हत्या एवढ्या मोठ्या आवाजात सगळं चालू होतं..
मग एकच जोरदार "ओ भोंगावाले भैया, आवाज कम करो" असं दरडावून सांगितल्यावर त्याने आवाज कमी केला. (कॉमन जागी वावरताना तुम्ही Classical - Hip Hop - Pop - Hard Rock - पंजाबी ‌‌- भोजपुरी किंवा पॉर्नमध्ये होणारे आवाज काहीही ऐका पण स्वतःसाठी ऐका कानात Headphones टाकून.. जगाला त्रास द्यायची काही गरज नाही).

आम्ही ठरल्याप्रमाणे बरोबर ७.३० ला नुब्राहून श्यओक नदीच्या कडेकडेने पॅंगॉंगला जायला निघालो.. ह्या सबंध रस्ता डबल लेन करण्याचं काम जोरात सुरू आहे त्यामुळे आमचा प्रवास अगदी संथगतीने सुरू होता.. साधारण दीड - दोन तासांच्या प्रवासानंतर आमच्या पुढे असणारी इनोव्हा एकाएकी डाव्या बाजूला झाली आणि थांबली.. आमच्या ड्रायव्हर काकांना थोडं पुढे आल्यावर शंका आली आणि त्यांनी आरशात पाहून - दोन तीन वेळा हॉर्न वाजवून - खिडकीतून हात बाहेर काढत काहीतरी हातवारे करून मागच्या गाडीच्या ड्रायव्हरला विचारलं तर असं लक्षात आलं की त्या गाडीचं एक टायर पंक्चर झालं आहे.. मग आमचे ड्रायव्हर काका पळत पळत मागे गेले आणि त्या ड्रायव्हरला टायर बदलायला मदत करू लागले.. त्या दोघांना अजून काही मदत हवी आहे का ते बघायला मी पण मागे गेलो. पाहतो तर गाडीतील २ पुरुष मंडळी बाहेर टाईमपास करत उभी आहेत आणि आत गाडीमध्ये एक महाराणी साहेबा मस्त विश्रांती घेत आहेत ते पण दोघे ड्रायव्हर गाडीचं चाक बदलत असताना.. आणि नंतर पॅंगॉंगला पोहोचल्यावर ह्याच महाराणी साहेबा नवरोबासोबत मस्त फोटो काढून घेत होत्या.

पुढे मजल दर मजल करत आम्हीपण पॅंगॉंगला पोहोचलो..
त्या आधी पॅंगॉंगच्या २०-२५ किमी अलिकडे मर्मोट हा खारवर्गीय प्राणी पण जवळून पाहता आला.. बाकीचे लोकं त्या प्राण्याला पाहून घरात कुत्र्या - मांजराला करतात तसं यू-यू-यू करत होते.. एक माणूस त्या प्राण्याच्या जवळ उभा राहून सिगारेट ओढत होता.. काही लोकं त्या प्राण्याला डोक्यावर गोंजारत होते.. लोकांना सांगायचा प्रयत्न करून पण लोकं त्यांना हवं तसंच वागत होते..

पॅंगॉंगच्या First View Point पासूनच मन इतकं प्रसन्न झालं होतं की काही विचारू नका.. ढगांच्या सावल्या पॅंगॉंग लेकवर तसेच समोरच्या डोंगरावर दिसत होत्या.. पॅंगॉंग मिनिटा मिनिटाला गडद निळा - फिका निळा असे रंग बदलत होता.. ते पाहात बसणं म्हणजे एक पर्वणीच होती.. पॅंगॉंगला फोटो काढून आम्ही मान गावातल्या आमच्या ठरलेल्या रिसॉर्टवर पोहोचलो.. तिथे चहा आणि गरमागरम कांदाभजी आमची वाट बघत होती.. हळूहळू ऊन कमी होत गेलं आणि अंधार पडत पडत थंडी देखील वाढू लागली.. वाराही खूप होता.. अशा वातावरणात आम्ही रात्रीच्या जेवणावर मस्तपैकी ताव मारला आणि ३-३ पांघरूणं घेत झोपी गेलो..



❤️

Day 7 - 17th August, 2023Nubra Valley - Turtuk - Nubra Valley आज नुब्रा व्हॅलीतून थांग आणि तुर्तुक हि गावं पाहण्यासाठी ज...
08/10/2023

Day 7 - 17th August, 2023
Nubra Valley - Turtuk - Nubra Valley

आज नुब्रा व्हॅलीतून थांग आणि तुर्तुक हि गावं पाहण्यासाठी जायचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही सकाळी ८ च्या सुमारास ब्रेकफास्ट वगैरे आटोपून निघालो..

पहिला स्टॉप डिरेक्टली थांग या गावी घेतला.. हे गाव म्हणजे भारतीय हद्दीतील शेवटचं गाव.. १९७१ च्या भारत - पाकिस्तान युद्धात मेजर चेवांग रिंचेन यांनी एका रात्रीत तुर्तुक पासून थांगपर्यंतचा भूभाग जिंकून घेतला होता आणि त्याबद्दल त्यांना महावीर चक्राने गौरविण्यात आलं होतं..
दुर्बिणीतून पाहिलं तर थांग या गावातून पाकिस्तानच्या हद्दीतील शेवटचं गाव फारनू हे पण दिसतं. पाकिस्तानचे डोंगररांगेत लपलेले बंकर्स पण दिसतात.. एक वेगळाच अनुभव आहे हा..

तिथून पुढे आम्ही आलो गोबा अली यांच्या घर कम म्युझियम मध्ये.. गोबा म्हणजे लदाखी भाषेत गावचा मुखिया - जसं आपल्याकडे सरपंच पद असतं तसं.. ह्या माणसाची पण भेट ग्रेट भेट ठरली.. त्यांच्याबद्दलची सविस्तर पोस्ट नंतर..

तिथून आम्ही आलो तुर्तुक गावी.. इथल्या त्या फेमस ब्रीजचे फोटो आधी पाहिले होते.. पण इथे पोहोचल्यावर या गावात एक पॅलेस आणि म्युझियम पण आहे हे कळालं.. आम्ही रस्ता विचारत विचारत तिथे पोचलो.. जुजबी बोलणं झाल्यावर कळलं की आपण ज्या माणसाशी बोलत आहोत तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द त्या पॅलेसचा कर्ता धर्ता आहे आणि त्याच्याच पूर्वजांनी हा पॅलेस बांधला आहे.. तो पॅलेस होता याबगो पॅलेस आणि तो माणूस होता याबगो मोहम्मद खान काचो..
ह्या माणसाबद्दलची पण सविस्तर पोस्ट नंतर..

हे सगळं पाहून झाल्यावर तिथल्या एका हॉटेलमध्ये मस्त जेवण करून आम्ही नुब्रा व्हॅलीच्या परतीच्या प्रवासाला लागलो..



❤️

Day 6 - 16th August, 2023Leh - Khardung la - Nubra Valley आज (म्हणजे काल) Trip मधला सगळ्यात खडतर प्रवास होता.. आम्ही सगळ...
01/10/2023

Day 6 - 16th August, 2023
Leh - Khardung la - Nubra Valley

आज (म्हणजे काल) Trip मधला सगळ्यात खडतर प्रवास होता.. आम्ही सगळे लेहहून(11500ft) खारदुंग ला पास(17982ft) Cross करून पुढे नुब्रा व्हॅली(10000ft) मध्ये जाणार होतो..

नेहमीप्रमाणे सकाळी लवकर आटपून आम्ही निघालो आणि नेमका खारदुंग ला च्या काही किलोमीटर अलीकडे रस्त्याचं काहीतरी काम चालू असल्याने आम्ही एकाच ठिकाणी तासभर अडकून पडलो.. आमच्यापुढे पण चांगल्या ४०-४५ गाड्यांची रांग लागली होती.. आधी पलिकडून येणाऱ्या गाड्या Clear झाल्यावर आमचा नंबर लागला.. आणि आम्ही एकदाचे त्या खारदुंग ला ला पोहोचलो.. पाहतो तर काय ही तोबा गर्दी.. त्या गर्दीतून वाट काढत काढत शेवटी त्या Altitude लिहिलेल्या भिंतीपाशी आम्ही फोटो काढून लागलीच पुढच्या प्रवासाला निघालो.. कारण एवढ्या उंचीवर फार काळ थांबणं धोकादायक होतं..

पुढे जाऊन नॉर्थ पुल्लूइथे एका बंगाली धाब्यावर मसाला चहा प्यायलो..(वेटरने बाकीच्या लोकांना काचेच्या ग्लास मधून आणि आम्हाला कागदी कपातून चहा दिलंन त्यामुळे परत डोकं सटकलं पण शांत राहणं पसंत केलं - म्हटलं आत्ताच खारदुंग ला उतरून आलो आहे.. उगाच त्या वेटरला काही नको बोलायला..)

पुढे श्यओक नदीच्या तीराने आमचा प्रवास सुरु राहीला.. नुब्रा व्हॅली मध्ये पोहोचल्यावर आधी मैत्रेय बुद्धाचा १०८ फुटी पुतळा पाहिला.. असं म्हणतात की मैत्रेय बुद्ध (The Buddha of the Future) अजून अडीच हजार वर्षांनी जन्म घेईल आणि पृथ्वीचं कल्याण करेल.. तिथून पुढे दिस्कीत मॉनेस्ट्रीला भेट दिली आणि हुंदर सॅंड ड्युन्सला Bactrian Camel (Double hu**ed) ची Ride घेऊन सरळ हॉटेलमध्ये गेलो..

हॉटेलचे कॉटेजेस पण मस्त होती.. प्रशस्त होती.. हॉटेलच्या प्रॉपर्टीमधून एक वाहता झरा होता.. पाणी कमालीचं थंडगार होतं.. अगदी Fridge मधून काढल्यावर असतं तसं..

खारदुंग ला पासचा Luckily कुणाला काही त्रास झाला नाही त्यामुळे एकंदरीत दिवस चांगला गेला..



❤️

Day 5 - 15th August, 2023Leh Local Sightseeingआज लेह मध्ये लोकलच साईटसीईंग असल्याने थोडं निवांत गणित होतं.. हेमिस मॉनेस्...
29/09/2023

Day 5 - 15th August, 2023
Leh Local Sightseeing

आज लेह मध्ये लोकलच साईटसीईंग असल्याने थोडं निवांत गणित होतं..
हेमिस मॉनेस्ट्री, थिकसे मॉनेस्ट्री, रॅंचो स्कूल, शे पॅलेस, शांती स्तूप हे नेहमीचं साईटसीईंग तर झालंच पण १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी लेह मधील हॉल ऑफ फेम पण बघता आलं आणि शिवाय तिथला अप्रतिम असा Light And Sound Show सुद्धा पहायला मिळाला..(१४ तारखेला सोमवार‌ होता - दर सोमवारी हॉल ऑफ फेम बंद असतं - तिकीट दर माणशी ₹२५०/-)

त्या Light And Sound Show मध्ये मेजर शैतान सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, मेजर चेवांग रिंचेन आणि अशा भारतीय सेनेच्या असंख्य जवानांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची माहिती मिळाली..

फार सुंदर असा हा कार्यक्रम अगदी न चुकवण्यासारखा आहे.. इतका की लेहच्या ट्रिपला येऊन तुम्ही हा कार्यक्रम जर चुकवलात तर तुम्ही लेहच्या ट्रिप मध्ये नापास झाला आहात असं समजा..



❤️

Address

Right Bhusari Colony, Paud Road, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unadkya.com - आम्ही फक्त उनाडक्या करतो:

Videos

Share

Nearby travel agencies


Other Eco Tours in Pune

Show All