Jiddi Mountaineering

Jiddi Mountaineering Basic and advanced adventures in and near Ratnagiri across Maharashtra for everyone! We take care of your safety. All we need is discipline. Call us!
(34)

ट्रेकिंग म्हणजे केवळ सहल न होता अविस्मरणीय अनुभवातून अनेकविध गोष्टींची माहिती देणारा छंद व्हावा, गीरीदुर्गा...ंमागे दडलेला आपला वैभवशाली इतिहास जाणावा. हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं

जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!!!"

Summer Adventure Camp 2024🧗‍♂️🧘‍♂️🏊‍♀️🚣‍♀️🥇🏕⛺🎯🚩नमस्कार मित्रांनो,दरवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येत आहे su...
16/04/2024

Summer Adventure Camp 2024🧗‍♂️🧘‍♂️🏊‍♀️🚣‍♀️🥇🏕⛺🎯🚩

नमस्कार मित्रांनो,
दरवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येत आहे summer adventure camp...

आपल्या मुलांचे धाडस वाढविण्यासाठी आपण एक धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुलांना निडर बनवण्यासाठी पालकांना असे धाडसी निर्णय घ्यावेच लागतात.....कारण या कॅम्प मध्ये मुलांना साहसी बनविण्यासाठी घेऊन आलो आहे अनेक साहसी उपक्रम... ज्यातून मुलांच्या शारीरिक व बौद्धिक क्षमता आपल्याला कळतात व त्या क्षमता विकसित होऊन मुलांचा आत्मविश्वास वाढतो....

👉हे उपक्रम खालील प्रमाणे...🏅
हे उपक्रम काही भागात विभागले जातात.
1) TeamWork Skills
2) Creativity
3) Thrilling Task
4) Jungle Ithics
5) Decision Making

👉 🔸Activities🔸👈
1) Equipment Intro
2) Knot Practice
3) Tent Pitching
4) Tent Stay
5) Commando Bridge
6) Valley Crossing
7) Jumaring
8) Rappelling
9) Rifle Shooting
10) Open Mic
11) Rock Climbing
12) Ladder Climbing
13) Camp Fire
14) Team Building Games
15) Star Gazing
16) Parralal Rope
17) Nature Walk
18) Fort Explore
19) Treasure Hunt
20) Night Trek

असे अनेक साहसी उपक्रम या कॅम्पमध्ये घेतले जाणार आहे व Camp पूर्ण झाल्यावर सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल दिले जाणार आहे... तरी ही उन्हाळ्याची सुट्टी आपल्या मुलांना नवीन काहीतरी शिकवण्यासाठी घालवूया.

🔹शिबीर कालावधी - 3 दिवस-2 रात्र🔹
👉बॅच 1
🏅26/04/24 ते 28/04/24
👉बॅच 2
🏅4/05/24 ते 6/05/24

👉फी - 3699/- रूपये.

👉🏅वैशिष्ट्ये-
1) निसर्ग रम्य वातावारण
2) प्रशिक्षित व अनुभवी प्रशिक्षक
3) 100% सुरक्षिततेची हमी
4) मुलींसाठी ladies Assistant
5) 13 वर्षांचा अनुभव
6) नोंदणीकृत संस्था

👉Camp Location - Ratnadurg Fort, Ratnagiri.
(Bhagwati Temple)👈

या *उन्हाळी सुट्टीत* काहीतरी *अफलातून* करायचं आहे..तर मग वाट कसली बघताय…*सामील व्हा* …!!जिद्दी माउंटेअनिरींग आयोजित *Sum...
04/03/2024

या *उन्हाळी सुट्टीत* काहीतरी *अफलातून* करायचं आहे..
तर मग वाट कसली बघताय…
*सामील व्हा* …!!
जिद्दी माउंटेअनिरींग आयोजित *Summer Camp* मध्ये...!!

*ज्यामध्ये समाविष्ट अँक्टिव्हिटीज* :- रॉक क्लाइंबिंग, कमांडो ब्रिज, पॅरलल रोप, झुमारिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, Equipment ओळख, Tent लावणे, Ladder क्लाइंबिंग, टीम बिल्डिंग गेम्स, कॅम्प फायर आणि *अजून बरंच काही…!!*

कालावधी : 26,27,28 एप्रिल 2024
: 4,5,6 मे 2024
*ठिकाण : रत्नदुर्ग किल्ला*

*तर मग येताय ना…*
For more Detail :-
*9637740779 / 8390764464*

जिद्दी माउंटेनिअरिंग घेऊन आलीय एक अविस्मरणीय अद्भुत अनुभव! एकाच वेळी सात धबधबे ट्रेक करत पाहण्याचा, त्यात मनसोक्त पोहण्य...
29/02/2024

जिद्दी माउंटेनिअरिंग घेऊन आलीय एक अविस्मरणीय अद्भुत अनुभव! एकाच वेळी सात धबधबे ट्रेक करत पाहण्याचा, त्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटण्याचा.🏊‍♀️🏊‍♂️🤽‍♂️🤽‍♀️
चला तर मग... 🏃🏻‍♂️🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️🏃🏻‍♀️

या उन्हाळी सुट्टीत काहीतरी अफलातून करायचं आहे... तर मग वाट कसली बघताय…सामील व्हा …!!जिद्दी माउंटेअनिरींग आयोजित Summer C...
26/02/2024

या उन्हाळी सुट्टीत काहीतरी अफलातून करायचं आहे...
तर मग वाट कसली बघताय…
सामील व्हा …!!
जिद्दी माउंटेअनिरींग आयोजित Summer Camp मध्ये...!!

ज्यामध्ये समाविष्ट अँक्टिव्हिटीज :- रॉक क्लाइंबिंग, कमांडो ब्रिज, पॅरलल रोप, झुमारिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, Equipment ओळख, Tent लावणे, Ladder क्लाइंबिंग, टीम बिल्डिंग गेम्स, कॅम्प फायर आणि अजून बरंच काही…!!

तर मग येताय ना…
For more Detail :-
9637740779 / 8390764464

बाईक चालवायची आवड आहे... फिरण्यासाठी थोडी सवड आहे...पुढे साहसी  रोड आहे...हिमालयाला भेटीची ओढ आहे...मग वाट कसली बघताय......
20/02/2024

बाईक चालवायची आवड आहे...
फिरण्यासाठी थोडी सवड आहे...
पुढे साहसी रोड आहे...
हिमालयाला भेटीची ओढ आहे...

मग वाट कसली बघताय...
सहभागी व्हा....
लेह लडाख बाईक टूर 2024

जिद्दी माउंटेनिअरिंग घेऊन आलीय एक अविस्मरणीय अद्भुत अनुभव! एकाच वेळी सात धबधबे ट्रेक करत पाहण्याचा, त्यात मनसोक्त पोहण्य...
16/02/2024

जिद्दी माउंटेनिअरिंग घेऊन आलीय एक अविस्मरणीय अद्भुत अनुभव! एकाच वेळी सात धबधबे ट्रेक करत पाहण्याचा, त्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटण्याचा.🏊‍♀️🏊‍♂️🤽‍♂️🤽‍♀️

चला तर मग... 🏃🏻‍♂️🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️🏃🏻‍♀️

जय श्रीकृष्ण 🙏🌺नमस्ते रत्नागिरीकर🙏जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसरी गिरनार यात्रा घेऊन जात आहे.गिरनार यात्रा ⛰️१३ ते १७ एप...
16/02/2024

जय श्रीकृष्ण 🙏🌺

नमस्ते रत्नागिरीकर🙏

जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसरी गिरनार यात्रा घेऊन जात आहे.

गिरनार यात्रा ⛰️
१३ ते १७ एप्रिल २०२४ | ५ दिवस, ४ रात्र | ₹ ७,५००/-

भालकातीर्थ मंदिर :-
भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचं मंदिर बांधण्यात आले आहे. वेरावळ ते प्रभास या मार्गावर हे प्राचीन पवित्र स्थान आहे. कथेनुसार दारूच्या नशेत असलेल्या यादवांचा अंतर्गत लढाईत संहार झाला. यामुळे नाराज होऊन भगवान श्रीकृष्ण आपला डावा पाय उजव्या पायावर ठेऊन पिंपळाच्या झाडाखाली योग समाधीत बसले होते. तेव्हा जरा नावाच्या शिकारीने भगवान श्रीकृष्णाच्या कमळाच्या पायाला हरणाचे तोंड समजून बाण मारला. शिकारीचा हा बाण भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायाच्या तळव्याला लागला. शिकारी जेव्हा आपल्या शिकाराजवळ पोहोचला तेव्हा त्याला दिसले की त्याची शिकार हरीण नसून पुरुषोत्तम हा यादव कुलपिता आहे. तो घाबरला आणि त्याच्या गुन्ह्याबद्दल माफी मागू लागला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला आश्वासन दिले, "जे काही घडले ते माझ्या इच्छेनुसार झाले आहे." असे म्हणत त्यांनी पारधीला क्षमा केली आणि कांतीसह वसुंधरा भेदून ते निजधामकडे रवाना झाले. येथे पारधीने भगवान श्रीकृष्णांना भल्ला (बाण) मारला, त्यामुळे या स्थानाला भल्ला (भालका) तीर्थ म्हणतात.

आपण या यात्रेमध्ये पाहणार आहोत 👇

📌 गिरनार शिखर
📌 सोमनाथ मंदिर
📌 भालकातीर्थ
📌 स्वामीनारायण मंदिर
📌 भवनाथ मंदिर
📌 स्वयंभू धुनी
📌 गोरक्षनाथ मंदिर
📌 अंबाजीमाता मंदिर

मर्यादीत जागा असल्याने ही संधी गमावू नका. आजच कॉल करून नोंदणी करा. 📲

चला तर मग येताय ना गिरनार यात्रेला जिद्दी सोबत...?
आम्ही वाट पाहतोय🙏💐

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
JIDDI Mountaineering | JIDDI Xtreme
8390764464 / 9637740779

Think Jiddi, Travel Jiddi

शुध्द निसर्ग, हिमालयीन थंड हवा, पवित्र नद्यांचा संगम, हिंदुत्वाची सनातन मंदिरे, देवदर्शन, भक्ती व अध्यात्माचा सुरेख संगम...
11/02/2024

शुध्द निसर्ग, हिमालयीन थंड हवा, पवित्र नद्यांचा संगम, हिंदुत्वाची सनातन मंदिरे, देवदर्शन, भक्ती व अध्यात्माचा सुरेख संगम आणि River Rafting चा थरार...
अनुभवायचा असेल तर सामील व्हा....
दो धाम यात्रा....
( अधिक माहितीसाठी संपर्क - 9637740779 )

Do you want to do something "out of box" beyond  your Ability and Capacity....??Join to us....Tail baila Climbing 2024Hu...
10/02/2024

Do you want to do something "out of box" beyond your Ability and Capacity....??

Join to us....
Tail baila Climbing 2024
Hurry up.....

जिद्दी माऊंटेनीरिंग या संस्थेने त्रिंबकेश्वर रेंज मधील पहिने नवरा, पहिने नवरी, संडे १ आणि डांग्या हे नाशिक जिल्ह्यातील स...
10/02/2024

जिद्दी माऊंटेनीरिंग या संस्थेने त्रिंबकेश्वर रेंज मधील पहिने नवरा, पहिने नवरी, संडे १ आणि डांग्या हे नाशिक जिल्ह्यातील सुळके यशस्वीरित्या सर केले. या मध्ये मंगेश बाळू कोयंडे (मोहीम नेता), अरविंद नवेले (लीड क्लायांबर) आणि अमोल अळवेकर सहभागी झाले होते. हे सर्व सुळके आम्ही सिक्वेन्स क्लायम्बिंग पद्धतीने सर केले आहेत.

Height of Pinnacles
Pahine Navra - 140 Fts,
Pahine Navri - 140 Fts,
Sunday 1 - Actual Height 240 Fts we climbed 140 Fts,
Dangya - 190 Fts Climbing Height -230 Fts

नमस्ते रत्नागिरीकर🙏       जिद्दी माऊंटेनिअरिंग सोबत अनुभवा एक रोमांचक आणि उत्साहवर्धक असा खेळ रिव्हर राफ्टिंग 🚣🏻🚣🏻‍♀️केद...
09/02/2024

नमस्ते रत्नागिरीकर🙏

जिद्दी माऊंटेनिअरिंग सोबत अनुभवा एक रोमांचक आणि उत्साहवर्धक असा खेळ रिव्हर राफ्टिंग 🚣🏻🚣🏻‍♀️

केदारनाथ ट्रेक
८ जून ते १५ जून २०२४ | ८ दिवस, ७ रात्र |

प्रवेश शुल्क :-
मुंबई ते मुंबई - २०,९९९/-
रत्नागिरी ते रत्नागिरी - २१,५९९/-

रिव्हर राफ्टिंग :-
रिव्हर राफ्टिंग (River Rafting) एक रोमांचक आणि उत्साहवर्धक असा खेळ आहे. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध मंडळींपर्यंत रिव्हर राफ्टिंगचं क्रेझ पाहायला मिळतं. रिव्हर राफ्टिंग करणं कठीण असून त्यामुळे तुमच्या जीवाला धोका असू शकतो असं सांगितलं जातं. मात्र असं मुळीच नाही जर तुम्ही सुरक्षेची साधने वापरली आणि तज्ञ्ज व्यक्तीच्या सोबत रिव्हर राफ्टिंग केलं तर तुम्हाला या खेळाचा खरा आनंद नक्कीच लुटता येतो. ऋषीकेशमध्ये वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गंगा नदीत राफ्टिंग करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. ऋषीकेशमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये या साहसी खेळाचं सर्वात जास्त क्रेझ दिसून येतं. उत्तराखंडमध्ये फिरताना आपण या गंगा नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करणार आहोत.

आपण या ट्रेकमध्ये पाहणार आहोत 👇

📌 केदारनाथ मंदिर
📌 ऋषिकेश
📌 रिव्हर राफ्टिंग
📌 राम झुला आणि लक्ष्मण झुला
📌 हरिद्वार
📌 सितापुर
📌 गुप्तकाशी

चला तर मग येताय ना केदारनाथ ला जिद्दी सोबत...?
आम्ही वाट पाहतोय🙏💐

आजच कॉल करून नोंदणी करा. 📲

अधिक माहितीसाठी आजच संपर्क.
JIDDI Mountaineering | JIDDI Xtreme
8390764464 / 9637740779

Think Jiddi, Travel Jiddi

जय सोमनाथ 🙏🔱🌺नमस्ते रत्नागिरीकर🙏जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसरी गिरनार यात्रा घेऊन जात आहे.गिरनार यात्रा ⛰️१३ ते १७ एप्र...
05/02/2024

जय सोमनाथ 🙏🔱🌺

नमस्ते रत्नागिरीकर🙏

जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसरी गिरनार यात्रा घेऊन जात आहे.

गिरनार यात्रा ⛰️
१३ ते १७ एप्रिल २०२४ | ५ दिवस, ४ रात्र | ₹ ७,५००/-

सोमनाथ मंदिर :-
सोरठी सोमनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. सोमनाथ मंदिर, ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात, सोमनाथ मंदिर गुजरात राज्याच्या वेरावळ या ठिकाणी समुद्रकिनारी वसले आहे. शंकर महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ या अतिप्राचीन मंदिराचे अस्तित्व हे 2000 वर्षाहून अधिक मानले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर महादेवाचे शिवलिंग आहे. मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे सोन्याचा आहे. या मंदिरात देवांचे देव शंकर महादेवाची पूजा केली जाते.

आपण या यात्रेमध्ये पाहणार आहोत 👇

📌 गिरनार शिखर
📌 सोमनाथ मंदिर
📌 भालकातीर्थ
📌 स्वामीनारायण मंदिर
📌 भवनाथ मंदिर
📌 स्वयंभू धुनी
📌 गोरक्षनाथ मंदिर
📌 अंबाजीमाता मंदिर

मर्यादीत जागा असल्याने ही संधी गमावू नका. आजच कॉल करून नोंदणी करा. 📲

चला तर मग येताय ना गिरनार यात्रेला जिद्दी सोबत...?
आम्ही वाट पाहतोय🙏💐

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
JIDDI Mountaineering | JIDDI Xtreme
8390764464 / 9637740779

Think Jiddi, Travel Jiddi

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥नमस्ते रत्नागिरीकर🙏       जिद्दी माऊंटेनिअरिंग आपल्यासाठी घे...
31/01/2024

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥

नमस्ते रत्नागिरीकर🙏

जिद्दी माऊंटेनिअरिंग आपल्यासाठी घेऊन आले आहे सर्वांच्या आकर्षणाचे ठिकाण असलेले, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र केदारनाथ ट्रेक 🙏

केदारनाथ ट्रेक
८ जून ते १५ जून २०२४ | ८ दिवस, ७ रात्र |

प्रवेश शुल्क :-
मुंबई ते मुंबई - २०,९९९/-
रत्नागिरी ते रत्नागिरी - २१,५९९/-

केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित आहे. गौरीकुंडहून खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते.

आपण या ट्रेकमध्ये पाहणार आहोत 👇

📌 केदारनाथ मंदिर
📌 ऋषिकेश
📌 रिव्हर राफ्टिंग
📌 राम झुला आणि लक्ष्मण झुला
📌 हरिद्वार
📌 सितापुर
📌 गुप्तकाशी

चला तर मग येताय ना केदारनाथ ला जिद्दी सोबत...?
आम्ही वाट पाहतोय🙏💐

आजच कॉल करून नोंदणी करा. 📲

अधिक माहितीसाठी आजच संपर्क.
JIDDI Mountaineering | JIDDI Xtreme
8390764464 / 9637740779

Think Jiddi, Travel Jiddi

‘केदारनाथ’ ट्रेकच्या पहिल्या बॅचचे पहिले निमंत्रण रत्नागिरीचे ग्रामदैवत “श्री भैरी बुवाला”... 🙏🔱🌼 #जयभैरी❤️🌼            ...
31/01/2024

‘केदारनाथ’ ट्रेकच्या पहिल्या बॅचचे पहिले निमंत्रण रत्नागिरीचे ग्रामदैवत “श्री भैरी बुवाला”... 🙏🔱🌼
#जयभैरी❤️🌼

Kedarkanth Peak Summit...🚩🇮🇳 ( 12500 ft )
26/01/2024

Kedarkanth Peak Summit...🚩🇮🇳
( 12500 ft )

ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: 🙏🌺नमस्ते रत्नागिरीकर🙏जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसरी गिरनार यात्रा घेऊन जात आहे.गिरनार यात्रा ⛰...
17/01/2024

ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: 🙏🌺

नमस्ते रत्नागिरीकर🙏

जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसरी गिरनार यात्रा घेऊन जात आहे.

गिरनार यात्रा ⛰️
१३ ते १७ एप्रिल २०२४ | ५ दिवस, ४ रात्र | ₹ ७,५००/-

ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे मिळून एक सुंदर रूप म्हणजेच दत्त रूप. दत्त महाराज यांची अनेक रूपे आणि अनेक मंदिरे आपल्या भारतात आहेत. दत्त महाराजांचे असेच एक ठिकाण जिथे स्वतः दत्त महाराजांनी वास्तव्य करून ते ठिकाण पावन केलेले आहे, पर्वत शिखरांच्या समूहात आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या सुंदर वातावरणात जिथे अनेक सिद्ध पुरुष तसेच साक्षात तेहत्तीस कोटी देवांचा वास आहे, ते ठिकाण म्हणजे गुजरात मधील ‘गिरनार’ पर्वत.

आपण या यात्रेमध्ये पाहणार आहोत 👇

📌 गिरनार शिखर
📌 सोमनाथ मंदिर
📌 भालकातीर्थ
📌 स्वामीनारायण मंदिर
📌 भवनाथ मंदिर
📌 स्वयंभू धुनी
📌 गोरक्षनाथ मंदिर
📌 अंबाजीमाता मंदिर

मर्यादीत जागा असल्याने ही संधी गमावू नका. आजच कॉल करून नोंदणी करा. 📲

चला तर मग येताय ना गिरनार यात्रेला जिद्दी सोबत...?
आम्ही वाट पाहतोय🙏💐

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
JIDDI Mountaineering | JIDDI Xtreme
8390764464 / 9637740779

Think Jiddi, Travel Jiddi

ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: 🙏नमस्ते रत्नागिरीकर🙏जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसऱ्या गिरनार यात्रेची घोषणा करत आहे.गिरनार यात्...
04/01/2024

ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: 🙏

नमस्ते रत्नागिरीकर🙏

जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली तिसऱ्या गिरनार यात्रेची घोषणा करत आहे.

गिरनार यात्रा ⛰️
१३ ते १७ एप्रिल २०२३ | ५ दिवस, ४ रात्र | ₹ ७,५००/-

ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे मिळून एक सुंदर रूप म्हणजेच दत्त रूप. दत्त महाराज यांची अनेक रूपे आणि अनेक मंदिरे आपल्या भारतात आहेत. दत्त महाराजांचे असेच एक ठिकाण जिथे स्वतः दत्त महाराजांनी वास्तव्य करून ते ठिकाण पावन केलेले आहे, पर्वत शिखरांच्या समूहात आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या सुंदर वातावरणात जिथे अनेक सिद्ध पुरुष तसेच साक्षात तेहत्तीस कोटी देवांचा वास आहे, ते ठिकाण म्हणजे गुजरात मधील ‘गिरनार’ पर्वत.

आपण या यात्रेमध्ये पाहणार आहोत 👇

📌 गिरनार शिखर
📌 सोमनाथ मंदिर
📌 भालकातीर्थ
📌 स्वामीनारायण मंदिर
📌 भवनाथ मंदिर
📌 स्वयंभू धुनी
📌 गोरक्षनाथ मंदिर
📌 अंबाजीमाता मंदिर

दर्शन यात्रा सुविधा

▪️ राहण्यासाठी AC Room.
▪️ एक रूम चार किंवा पाच जण वास्तव्य.
▪️ दोन्ही वेळेस जेवण.
▪️ 2nd Class स्लीपर कोच रेल्वेने प्रवास.
▪️ एक वेळ नाश्ता.
▪️ जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था.
▪️ संध्याकाळी चहा-बिस्कीट.
▪️ रोपवे सुविधा.
▪️मिनरल पाणी 1 लिटर Per Day

चला तर मग गिरनार यात्रेला जिद्दी सोबत...
आम्ही वाट पाहतोय🙏💐

अधिक माहितीसाठी संपर्क
JIDDI Mountaineering | JIDDI Xtreme
8390764464 / 9637740779

Think Jiddi, Travel Jiddi

‘गिरनार’ यात्रेच्या तिसऱ्या बॅचचे पहिले निमंत्रण रत्नागिरीचे ग्रामदैवत “भैरी बुवाला”. 🙏🔱🌼 #जयभैरी❤️🌼
04/01/2024

‘गिरनार’ यात्रेच्या तिसऱ्या बॅचचे पहिले निमंत्रण रत्नागिरीचे ग्रामदैवत “भैरी बुवाला”. 🙏🔱🌼
#जयभैरी❤️🌼

नमस्ते रत्नागिरीकर 💐जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली या मोसमातील दुसरी गिरनार यात्रे ची घोषणा करत आहे.गिरनार यात्रा ⛰️१५ ते १८ ...
20/09/2023

नमस्ते रत्नागिरीकर 💐

जिद्दी माऊंटेनिअरिंग आपली या मोसमातील दुसरी गिरनार यात्रे ची घोषणा करत आहे.

गिरनार यात्रा ⛰️
१५ ते १८ डिसेंबर २०२३ | ३ रात्र, ४ दिवस | ७०००/-

ब्रह्मा,विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे मिळून एक सुंदर रूप म्हणजेच दत्त रूप. दत्त महाराज यांची अनेक रूपे आणि अनेक मंदिरे आपल्या भारतात आहेत. दत्त महाराजांचे असेच एक ठिकाण जिथे स्वतः दत्त महाराजांनी वास्तव्य करून ते ठिकाण पावन केलेले आहे, जिथे पर्वत शिखरांच्या समूहात आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या सुंदर वातावरणात जिथे अनेक *सिद्ध पुरुष तसेच साक्षात तेहतीस कोटी देवांचा वास आहे, ते ठिकाण म्हणजे गुजरात मधील गिरनार पर्वत.

आपण पाहणार आहोत

📌 गिरनार शिखर
📌 सोमनाथ मंदिर
📌 भालकातीर्थ
📌 स्वयंभू धुनी
📌 अंबाजीमाता मंदिर
📌 भवनाथ मंदिर
📌 स्वामीनारायण मंदिर
📌 गोरखनाथ मंदिर

दर्शन यात्रा सुविधा

▪️2nd Class स्लीपर कोचने प्रवास
▪️एक रूम चार किंवा पाच जण वास्तव्य
▪️जेवणाची उत्कृष्ट सुविधा-व्यवस्था
▪️रोपवे सुविधा
▪️दोन्ही वेळेस जेवण
▪️सकाळी नाश्ता
▪️संध्याकाळी चहा-बिस्कीट
▪️मिनरल पाणी एक लिटर Per Day

चला तर मग गिरनार यात्रेला जिद्दी सोबत...
आम्ही वाट पाहतोय🙏💐

अधिक माहितीसाठी संपर्क
JIDDI Mountaineering | JIDDI Xtreme
8390764464 / 9637740779 / 9637202218

Think Jiddi, Travel Jiddi

Once again successfully completed Kalsubai Trek 12 -13 August 2023 with full Energy and Enjoyment... 🚩🚩🚩                ...
13/08/2023

Once again successfully completed Kalsubai Trek 12 -13 August 2023 with full Energy and Enjoyment... 🚩🚩🚩

चला तर मग पुन्हा एकदा लिंगाचा डोंगर ला😉🚩आम्ही घेऊन आलो आहोत लिंगा डोंगरची दुसरी बॅच आत्ताच कॉल करा.📲9637740779 / 8390764...
02/08/2023

चला तर मग पुन्हा एकदा लिंगाचा डोंगर ला😉🚩

आम्ही घेऊन आलो आहोत लिंगा डोंगरची दुसरी बॅच

आत्ताच कॉल करा.📲
9637740779 / 8390764464

Team JIDDI Mountaineering

पाऊस + धबधबा + रॅपलिंग = Niwali Waterfall Rappelling.....All In One...निसर्गामध्ये मज्जा.... मज्जेमध्ये निसर्ग....पावसात...
01/08/2023

पाऊस + धबधबा + रॅपलिंग = Niwali Waterfall Rappelling.....
All In One...
निसर्गामध्ये मज्जा.... मज्जेमध्ये निसर्ग....
पावसात धबधबा...... धबधब्यात पाऊस....
चला तर मग.. भेटू....
Niwali Waterfall Rappelling ला

MAHIMATGAD TREKDate: 30 July 2023Category: Trekking Location: Devrukh📌Duration: 1 dayDifficulty:  Medium Fees: 799/- Mee...
26/07/2023

MAHIMATGAD TREK

Date: 30 July 2023
Category: Trekking
Location: Devrukh📌
Duration: 1 day
Difficulty: Medium
Fees: 799/-
Meeting Time: 0515
Meeting Point: Swatantryaveer Sawarkar Natyagruh, Maruti Mandir, Ratnagiri.

रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी "जिद्दी माऊंटेनिअरिंगने"⛰️🚩 आयोजित केलेला संगमेश्वर तालुक्यातील 'लिंगा डोंगर' हा ट्रेक🚶🏻...
24/07/2023

रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी "जिद्दी माऊंटेनिअरिंगने"⛰️🚩 आयोजित केलेला संगमेश्वर तालुक्यातील 'लिंगा डोंगर' हा ट्रेक🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️सर्व सहभागींनी आनंद घेत यशस्वीरित्या पूर्ण केला. 🤟💪😍
त्यातील काही क्षणचित्रे 📸📱

हिमालयाचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ! 🏔🚩जिद्दी माऊंटेनीअरिंग जिल्हा असोसिएशन रत्नागिरी या संस्थेचे अरविंद अनंत नवेले...
19/07/2023

हिमालयाचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ! 🏔🚩

जिद्दी माऊंटेनीअरिंग जिल्हा असोसिएशन रत्नागिरी या संस्थेचे अरविंद अनंत नवेले यांनी हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पांजल रांगेच्या मध्यवर्ती असलेले आणि या भागातील सर्वात उंच आणि अत्यंत अवघड समजले जाणारे माऊंट हनुमान तिब्बा - ५९८२ मीटर - १९६२६ फुटांचे शिखर ५ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता यशस्वीरीत्या सर केले. जगातील काही मोजकीच लोकं या शिखराच्या माथ्यावर पोहचली आहेत आणि त्या यादीत आता आपण सुद्धा सामील झालो.

या हो अवघे लिंगाच्या डोंगराला जाऊ ते बी जिद्दी च्या संगतीनं. ⛰️🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️
18/07/2023

या हो अवघे लिंगाच्या डोंगराला जाऊ ते बी जिद्दी च्या संगतीनं. ⛰️🏃🏻‍♂️🏃🏻‍♀️

𝚃𝚘 𝚠𝚊𝚕𝚔 𝚒𝚗 𝚗𝚊𝚝𝚞𝚛𝚎 𝚒𝚜 𝚝𝚘 𝚠𝚒𝚝𝚗𝚎𝚜𝚜 𝚊 𝚝𝚑𝚘𝚞𝚜𝚊𝚗𝚍 𝚖𝚒𝚛𝚊𝚌𝚕𝚎𝚜. 🚶🏻‍♂️😍✨𝙺𝚊𝚕𝚜𝚞𝚋𝚊𝚒 𝚃𝚛𝚎𝚔 - 𝟷𝟸, 𝟷𝟹 𝙰𝚞𝚐𝚞𝚜𝚝 𝟸𝟶𝟸𝟹 ⛰️🚩                      ...
03/07/2023

𝚃𝚘 𝚠𝚊𝚕𝚔 𝚒𝚗 𝚗𝚊𝚝𝚞𝚛𝚎 𝚒𝚜 𝚝𝚘 𝚠𝚒𝚝𝚗𝚎𝚜𝚜 𝚊 𝚝𝚑𝚘𝚞𝚜𝚊𝚗𝚍 𝚖𝚒𝚛𝚊𝚌𝚕𝚎𝚜. 🚶🏻‍♂️😍✨

𝙺𝚊𝚕𝚜𝚞𝚋𝚊𝚒 𝚃𝚛𝚎𝚔 - 𝟷𝟸, 𝟷𝟹 𝙰𝚞𝚐𝚞𝚜𝚝 𝟸𝟶𝟸𝟹 ⛰️🚩

माचाळ भ्रमंती एका नव्या वाटेने जिद्दी सोबत. 😍
20/06/2023

माचाळ भ्रमंती एका नव्या वाटेने जिद्दी सोबत. 😍

कविवर्य गोविंदाग्रजानी "राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा" हे महाराष्ट्राचे केलेले वर्णन सह्याद्रीची अथांगता आणि काठिण...
11/06/2023

कविवर्य गोविंदाग्रजानी "राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा" हे महाराष्ट्राचे केलेले वर्णन सह्याद्रीची अथांगता आणि काठिण्यता पाहता अतिशय समर्पक वाटते. याच महाराष्ट्रात हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्या शेजारील शेंडी हा सुळका. माउंटेनिअरिंग क्षेत्रातील रत्नागिरीमधील प्रसिध्द Jiddi Mountaineering या अनुभवी आणि शिस्तप्रिय संस्थेने नुकतेच शेंडी सुळका चढाईचे शिवधनुष्य हाती घेऊन यशस्वी पूर्ण केले. या मोहिमेचे नेतृत्व श्री. अरविंद नवेले यांनी केले. त्याच्या सोबत जिद्दीचे प्रसाद शिगवण, अमरेश ठाकूरदेसाई, आकाश नाईक, ओंकार सागवेकर, हर्ष सहस्त्रबुद्धे, आशिष शेवडे, सिद्धेश गोरे हे सात शिलेदार होते.
थोडया अवघड वाटा, पाण्याची कमतरता अशा परिस्थितीत यशस्वीरीत्या क्लाइंबिंग पूर्ण करून सुळक्याच्या माथा गाठला.

Address

Ratnagiri
415612

Telephone

+918390764464

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jiddi Mountaineering posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jiddi Mountaineering:

Videos

Share