आम्ही पाडळीकर

आम्ही पाडळीकर Changbhale
(8)

 #पर्यावरण_पूरक_श्री_जोतिबा_सायकलवारी  #ऊंब्रज_जोतिबा_187km  #पिता_पुत्राची_सायकल  #वारीआजचा दै.सकाळ, कोल्हापूर आवृत्ती ...
06/05/2023

#पर्यावरण_पूरक_श्री_जोतिबा_सायकलवारी #ऊंब्रज_जोतिबा_187km #पिता_पुत्राची_सायकल #वारी
आजचा दै.सकाळ, कोल्हापूर आवृत्ती .धन्यवाद - श्री.निवास मोटे (पञकार)

 #पर्यावरण_पूरक_श्री_जोतिबा_सायकलवारी  #ऊंब्रज_जोतिबा_187km  #पिता_पुत्राची_सायकल  #वारीआजचा दै.पुढारी , कोल्हापूर आवृत्...
05/05/2023

#पर्यावरण_पूरक_श्री_जोतिबा_सायकलवारी #ऊंब्रज_जोतिबा_187km #पिता_पुत्राची_सायकल #वारी
आजचा दै.पुढारी , कोल्हापूर आवृत्ती

*श्री.बिपीन ढाणे (आय.आय.टी. खरगपुर)* पाडळी गावचे सुपुञ ..!खरेच यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. येवढे उच्च शिक्षण असु...
29/05/2022

*श्री.बिपीन ढाणे (आय.आय.टी. खरगपुर)* पाडळी गावचे सुपुञ ..!खरेच यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. येवढे उच्च शिक्षण असुन व मोठ्या पगाराची नोकरी सोडुन ते आसाम मधील दुर्गम भागात ते सामाजिक कार्य करीत आहेत याचा समस्त पाडळीकरांना अभिमान आहे.

आजचा दै. सकाळशब्दांकुर' पुरवणीत- #स्मरण_गंध (भूषण ढाणे)संपादन समन्वय। सुनील शेडगे, प्रशांत घाडगे 🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃
16/04/2022

आजचा दै. सकाळ
शब्दांकुर' पुरवणीत-
#स्मरण_गंध (भूषण ढाणे)
संपादन समन्वय। सुनील शेडगे, प्रशांत घाडगे

🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃

🍁 कोल्हापूर Explorer 🍁चैञाची चाहुल लागताच गावोगावी याञा-जञांचा माहौल चालु होतो.याच चैञ महिन्यात हस्त नक्षत्रावर पश्चिम म...
14/04/2022

🍁 कोल्हापूर Explorer 🍁

चैञाची चाहुल लागताच गावोगावी याञा-जञांचा माहौल चालु होतो.याच चैञ महिन्यात हस्त नक्षत्रावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी जोतिबा डोंगरावरची याञा पार पडते.साधारणपणे ८/१० लाख भावीक या याञेला उपस्थित असतात.याच याञेत पहिला मान असणार्या तीर्थक्षेञ पाडळी या गावाबद्दल आपणमाहीती घेवुया ! सातारा जिल्ह्यातील ठराविक मोठ्या याञांमध्ये पाडळी गावचा समावेश होते.शासनाने नुकताच काही वर्षे पुर्वी या तीर्थक्षेञाला "क" वर्ग दर्जा दिलेला आहे.पुढे वाचण्यासाठी खालिल लिंक ओपन करा.
https://kolhapurexplorer.com/ninam-padali-sasan-kathi/

कोल्हापूर माहिती विषयीची www.kolhapurexplorer.com ही वेबसाईट सुरू झाली आहे.खुप चांगचा प्रतिसाद मिळत आहे.तरी आपला या वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा ही विनंती.
https://forms.gle/yzXWqDAKqkfufaUu6

चैत्र यात्रा मधील प्रथम मानाची सासनकाठी असणार्या पाडळी गावाची परंपरा

13/04/2022

https://www.facebook.com/jotibapadali/
जोतिबा याञेसंबधित सर्व माहीती अपडेट मिळवण्यासाठी हे वरील फेसबुक पेज लाईक ,फाॕलो , शेअर करा व आपल्या मिञमंडळीनां ही निमंञीत करा..!

श्री जोतिबा चरणी निस्सिम भक्ती व सेवेस समर्पित..

https://www.facebook.com/jotibapadali/ #जोतिबा_यात्रेचे_शाहूकालीन_व्यवस्थापन व ऐतिहासिक माहीती*.दरवर्षी भाविकांच्या अमाप...
13/04/2022

https://www.facebook.com/jotibapadali/
#जोतिबा_यात्रेचे_शाहूकालीन_व्यवस्थापन व ऐतिहासिक माहीती*.
दरवर्षी भाविकांच्या अमाप गर्दीत तसेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे तसेच जोतिबा देवस्थानचे महत्त्व राजर्षी शाहू महाराजांनी जाणलेले होते. इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर यात्राकाळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले व ते अमलातही आणले.
वाडी रत्नागिरी ऊर्फ जोतिबा देवस्थानला फार प्राचीन व ऐतिहासिक परंपरा लाभलेली
आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारे कोल्हापूरचे आराध्य दैवत देवी श्री अंबाबाई या देवस्थानच्या समकालीन असणारे जोतिबा देवस्थान आहे. कोल्हापूरपासून अवघ्या २० किलोमीटरवर हे देवस्थान वसलेले आहे. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची नातसून करवीरकर जिजाबाई यांच्या कारकिर्दीत या देवस्थानच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी तळ्याची उभारणी झाल्याचे दिसून येते. जोतिबा डोंगरावरील श्री यमाई मंदिराजवळ हे तळे करवीरकर जिजाबाई यांनी उभारलेले आहे. या तळ्याच्या दक्षिण दरवाजाच्या कमानीवर याबाबतचा शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाचे वर्णन 'करवीर रियासत' या पुस्तकात आढळते. तसेच पन्हाळ्यावरील ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी १९५७ साली लिहिलेल्या जय केदार अर्थात जोतिबा या पुस्तकातही या शिलालेखाचा उल्लेख आलेला आहे.

जोतिबा देवस्थानकडे एक पोर्तुगीज घंटा आहे. ती शककर्ते शिवाजी महाराजांचे नातू व राष्ट्रवीर छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज (सातारा) यांनी जोतिबा देवस्थानला अर्पण केलेली आहे. या संदर्भातील एक पत्र कोल्हापूर पुरालेखागारातील ऐतिहासिक कागदपत्रांमधील 'निवडी दप्तर' या विभागात आहे. ही घंटा आजही जोतिबा देवस्थान येथील दक्षिण दरवाजाच्या वर असल्याचे दिसून येते. तसेच अंबाबाई मंदिरातील घंटा कालांतराने कोल्हापुरातील टाउन हॉल येथील वस्तुसंग्रहालयात जमा केलेली आहे. वस्तुसंग्रहालयातही या घंटेबाबत कागदपत्रांमध्ये नोंद आहे.

दरवर्षी भाविकांच्या अमाप गर्दीत तसेच उत्साहात साजऱ्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे तसेच या जोतिबा देवस्थानचे महत्त्व राजर्षी शाहू महाराजांनी जाणलेले होते. यात्राकाळात येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी त्यांनी अनेक विधायक निर्णय घेतले व ते अमलातही आणले. इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी जोतिबा डोंगरावरील दलित समाजाच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी विहीर बांधण्यासाठी १६२ रुपये मंजूर केले होते. कोल्हापूर संस्थानात इ. स. १८९९ मध्ये प्लेगची साथ पसरल्याने संस्थानातील बहुतांश देवस्थानच्या यात्रा व इतर प्रमुख सोहळे शाहू महाराजांनी रद्द केले होते. त्यांनी प्लेगच्या साथीच्या काळात राबविलेल्या अनेक विविध उपाययोजनांमुळे साथ आटोक्यात आणणे शक्य झाले.

या काळात जोतिबा देवस्थानची यात्राही मोठ्या प्रमाणावर भरलेली नव्हती. पण शाहू महाराजांच्या अथक प्रयत्नाने प्लेगची साथ बऱ्याचअंशी आटोक्यात आली. इ. स. १९०० मध्ये जोतिबा देवस्थानची यात्रा अनियंत्रितपणे भरू द्यावी, असा हुकूम शाहू महाराजांनी दिलेला होता. प्लेगच्या साथीच्या काळात प्लेगचा बंदोबस्त व्हावा यासाठी लसीकरण केलेल्या लोकांचे दाखले यात्राकाळात तपासण्यासाठी एक हंगामी कारकून महाराजांनी जोतिबा डोंगरावर नेमलेला होता. त्याच्या भत्त्याची भक्कम एक विशेष बाब समजून त्याला देण्याबाबतही महाराजांनी हुकूम दिलेला होता.

यात्राकाळात येणाऱ्या भाविकांचे सामाजिक प्रबोधन व्हावे यासाठी इ. स. १९०३ मध्ये जोतिबा डोंगर येथे जनावरांचा बाजार व जनावरांचे प्रदर्शन भरविण्याचे मंजूर केलेले होते. जनावरे विक्रीस घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडून तसेच या बाजारात जनावरे विकत घेणाऱ्या व्यक्तीकडून कोणताही कर घेऊ नये असा हुकूम महाराजांनी दिलेला होता. फक्त या व्यक्तींकडे संस्थानचा जनावरे खरेदी- विक्री करण्याचा दाखला असणे जरूरीचे केलेले होते. या बाजारात जनावरे घेणाऱ्या व्यक्तीने प्रथम कर भरावा व नंतर संस्थानचा दाखला दाखवून तो कर परत घ्यावा, याचीही सोय शाहू महाराजांनी केलेली होती.

इ. स. १९०४ मध्ये जोतिबा डोंगर येथे यात्राकाळात भरलेल्या जनावरांच्या प्रदर्शनात उत्तम प्रतीच्या जनावरास बक्षीस देण्यासाठी १२५३ रुपये मंजूर केलेले होते. यात्राकाळात येणाऱ्या यात्रेकरूंच्या तसेच जनावरांच्या बाजारात येणाऱ्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जो खर्च होईल तो देवस्थानने करामधील शिल्लक रकमेतून करावा, असा हुकूम दिला होता. यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याची तसेच निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केले होते. १९०३ मध्ये जोतिबा डोंगरावरील चव्हाण तळे, बेडूक बाव, कारदगेकराची विहीर यातील गाळ काढून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी २००-३०० रुपये खर्च करण्याचा आदेशही त्यांनी दिलेला होता.

१९०४ मध्ये जोतिबा डोंगरावरील धर्मशाळेनजीकच्या विहिरीतील गाळ काढण्यासाठी १५० रुपये कराच्या रकमेतून खर्च करावेत, असा हुकूमही महाराजांनी दिलेला होता. पुढे याच वर्षी गायमुख तलावातील गाळ काढून तेथे इतर सुधारणा करण्यासाठी तब्बल १३७८ रुपये कराच्या रकमेतून खर्च करावेत असा हुकूम दिला होता. १९०७ मध्ये यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी तसेच मैला निर्गतीसाठी सोय करण्यास ३१८ रुपये देवस्थानच्या शिल्लक रकमेतून खर्च करण्याबाबत आदेश दिलेला होता. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी विविध ठिकाणी महाराजांनी धर्मशाळेची उभारणी केलेली होती. मादळे गावच्या हद्दीत पाण्याच्या झऱ्यानजीक धर्मशाळा उभारण्यास १९०४ मध्ये सुरुवात करून ही धर्मशाळा १९०५ मध्ये पूर्ण झाली. यासाठी ११४४ रुपये सहा आणे खर्च आला होता. तो खर्चही महाराजांनी मंजूर केला. जोतिबा डोंगरावरील दलित लोकांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी कराच्या रकमेतून ३०० रुपये देण्याचे महाराजांनी मंजूर केलेले होते. मौजे कुशिरे गावच्या हद्दीत धर्मशाळा बांधण्याची जबाबदारी संस्थानचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर दक्षिण भाग विठ्ठल सदाशिव देसाई यांच्याकडे सोपविलेली होती. १९०७ मध्ये वाडी रत्नागिरी डोंगर रस्त्याच्या सातव्या मैलात पाण्याच्या टाकीनजीक दोन धर्मशाळा बांधण्यास दोन हजार रुपयांची मंजुरी दिली होती. तसेच या धर्मशाळेच्या रखवालीस व तेथे लावलेल्या लिंबाच्या रोपांना पाणी घालण्यासाठी एक व्यक्ती दरमहा पाच रुपये पगारावर नेमलेला होता. चैत्र पौर्णिमेची यात्रा ऐन उन्हाळ्यात येत असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या निवाऱ्याच्या सोयीसाठी जोतिबा डोंगरावर इ. स. १९०४ मध्ये झाडे लावण्यासाठी २०७ रुपये दोन आणे मंजूर केलेले होते.

चैत्र पौर्णिमेच्या यात्राकाळात जोतिबा डोंगरावर स्वच्छता राहावी असा शाहू महाराजांचा कटाक्ष होता. यासाठी १९०६ मध्ये यात्राकाळात स्वच्छता ठेवण्यासाठी ३१९ रुपये ६ आणे ६ पैशांची मंजुरी महाराजांनी दिलेली होती. १९०८ मध्ये यात्राकाळात स्वच्छता ठेवण्यासाठी ३०० रुपयांची मंजुरी दिलेली होती. १९१२ मध्ये चैत्र यात्रेत तसेच इतर दिवशीही स्वच्छता ठेवण्यासाठी एक भंगी व डोंगरावर लावलेल्या झाडांच्या रखवालीसाठी एक व्यक्ती नेमून त्याच्या पगारासाठी दरवर्षी १४६ रुपयांच्या खर्चासही हे काम सार्वजनिक व महत्त्वाचे असल्याने शाहू महाराजांनी मंजुरी दिलेली होती. जोतिबा डोंगरावरील हत्तीच्या सोयीसाठी हत्तीमहाल ही इमारत दुमजली करण्यासाठी १८२० रुपये महाराजांनी मंजूर केलेले होते.

महाराजांनी जोतिबा देवस्थानकडे आणखी एक विधायक प्रयोग केलेला होता. त्यांनी गायमुख तलावाजवळ रेशीम तयार करण्याचा कारखाना काढला होता. संस्थानातील लोकांना या उद्योगाचे जास्त ज्ञान नसल्याने त्यासाठी एक माणूस खास जपानवरून मागवलेला होता. त्याचे नाव रिओ झो तोफो असे होते. त्याच्यावर रेशीम कारखान्याची सर्व जबाबदारी सोपवून दरमहा २५ रुपये पगारावर त्याची नेमणूक केली होती. तसेच कारखान्याच्या उत्पन्नाचा (खर्च वजा जाता) तिसरा हिस्सा देऊन भागीदार म्हणून नेमलेले होते. तसेच या कारखान्यासाठी गायमुख तलावाजवळ तुतूच्या झाडांची लागवडही महाराजांनी केलेली होती.

13/04/2022

🐎 चांगभल 🐎

13/04/2022
गुढीपाडवा मुहुर्तावर   #तीर्थक्षेञ_  #पाडळी_जोतिबा_सासनकाठी_क्र_१ उभी करणेत आली.  #जोतिबा_चैञी_उत्सवामधे महिनाभर  #मासां...
04/04/2022

गुढीपाडवा मुहुर्तावर #तीर्थक्षेञ_ #पाडळी_जोतिबा_सासनकाठी_क्र_१ उभी करणेत आली. #जोतिबा_चैञी_उत्सवामधे महिनाभर #मासांहार_वर्ज्य करणारे #पाडळी गाव
ता.जि. सातारा #शासनमान्यताप्राप्त _'क' #वर्ग देवस्थान...
१ ले मानकरी असणारे पाडळी गाव

देवस्थान व याञा सोहळा माहिती

कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे या गावापासून पश्चिमेला पाच किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात वसलेले गाव म्हणजे पाडळी (निनाम). जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा), जि. कोल्हापूर यथील चैत्र यात्रेत सामील होण्याऱ्या मानाच्या १०८ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पहिला मान पाडळी च्या सासनकाठीस आहे. या निशाण्याची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयात व इतिहासकालीन ताम्रपटावर आहे. या गावच्या सासन निशानाची हि परंपरा प्राचीन काळापासून लाभली आहे. सुमारे ४० ते ४५ फूट उंचीचे जाड निशाण, गर्द जांभळ्या रंगाचा फरारा (पताका) व तीन चुनी तोरणे बांधलेले असते.निशानावर फूलांच्या हारांची सुंदर आरास अतिशय कौशल्याने केलेली असते.सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे व तोरण्या सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते.गावातून दरवर्षी जोतीबाकडे २० ते २५ बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात सोबत हजारो ग्रामस्थ,भाविक पायी प्रवास करतात. गावातील घरटी एक माणूस या पदयात्रेत सहभागी असतो. सासनकाठी जोतीबाकडे मार्गस्थ होताना व माघारी येत असताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते. सुहासनी महिला निशानास ओवाळण्यास येतात भाविक मंडळी निशाणास विविध आकर्षक हार ,पाच नारळाचे तोरण, नोटांच्या माळा अर्पण करतात.
पाडव्यानंतर जोतिबा डोंगराकडे हे निशान आपल्या सर्व देवसेवक ( कारखानदार) याच्या लवाजम्या सहीत वाजत गाजत मार्गस्त होते. तीन दिवसांचा पायी प्रवास करून हे निशान जोतिबा डोंगराळ पोचते व चैञी याञेत सहभागी होते. श्री जोतिबा चैञी याञेत या निशानाला पहिला मान असुन हा मान छ.शाहु महाराजांनी दिलेला आहे.त्याही आधी पासुन ही सासनकाठी चैञी याञेत सहभागी होतच होती.जोतिबा याञेच्या मुख्य दिवशी उपस्थित मंञी महोदय व शासकिय अधिकारी लोकांच्या उपस्थिती मध्ये निशानाचे विधिवत पुजन होवुन दुपारी १.३० वा. सासनकाठी मिरवणूकीस प्रारंभ होतो. या निशानाच्या मागे मग विविध गावची मानाची निशाने क्रमाक्रमाने सामिल होतात. दोन दिवस जोतिबा डोंगरावर मुक्काम करून व तिथला सर्व याञा सोहळा पार पाडुन , मानाचे विडे घेवुन तोफेची सलामी झालेवर निशान लगेच परतीचा प्रवास सुरू करते.तीन दिवसांच्या परतीच्या प्रवासात निशान विविध गावातुन प्रवास करत असताना त्या त्या गावचे लोक निशानाचे मोठ्या आनंदात स्वागत करीत असतात .या ठिकाणी छबीना , आरती व अन्नदानाचे नियोजन हे गावकरी मोठ्या आनंदाने व भक्तिने करीत असतात.
तीन दिवसांचा प्रवास करून हे निशाण ज्या दिवशी पाडळी गावात पोचते त्या दिवशीच पाडळी गावची याञा असते. यावेळी पाडळी पंचक्रोशी तसेच इतर जिल्ह्यातील लाखो भाविक श्रीं च्या दर्शनासाठी गोळा होत असतात यावेळी भक्त भाविक हार तुरे,गोंडे, नारळाची तोरणे व नोटांच्या माळा श्री चरणी अर्पण करत असतात.गावच्या पावक्ता(पादुका) या ठिकाण पासुन ही याञा सायंकाळी ४ वाजता चालु होते व वाजत गाजत हे निशान राञी ८.३० वाजता श्री भैरवनाथ मंदीर येथे पोचते. त्यानंतर राञी ९.३० वाजता गावातील मुख्य चौकात "व्हण" या पारंपरिक ठिकाणी निशाण छबिन्या साठी उभे राहते. राञभर चालणार्या या छबिन्यात भक्त भाविक व गावकरी लोक श्रींना नारळ तोरणे , नोटांच्या माळा भक्तिभावाने अर्पण करतात.श्रद्धेने नवस बोलले जातात व फेडले जातात. राञभर हा छबिना पार पाडल्या नंतर पहाटे ५ वाजता हे निशान श्री जोतिबा मंदीराकडे प्रस्थान करते. सकाळी ८ वाजेपर्यंत हे निशान जोतिबा मंदीर येथे पोचते त्यानंतर आरती होवुन या दिवसाचा कार्यक्रम संपतो.या नंतर पाच दिवस सकाळ - संध्याकाळी श्रींची आरती होते. पाचव्या दिवशी पाकाळणी (प्रक्शालनाचा) कार्यक्रम असतो.या दिवशी ही भाविक विधीत स्वरूपात श्रीनाथांच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात.राञी ८.३० वाजता महाआरती होते.राञी १० वाजता पाखाळणीचा मुख्य कार्यक्रम चालु होतो यात निशानाला घातलेला पोशाख उतरवला जातो .याञेचा सर्व जमाखर्च जाहीर केला जातो .

-

*सातवी माळ**आज जागर त्या दिवसाची  #तीर्थक्षेत्र_पाडळी येथील ग्रामदैवत  #श्री_भैरवनाथ_मंदिरा मधील  #दख्खनचा_जोतिबाराजा_च्...
13/10/2021

*सातवी माळ*
*आज जागर त्या दिवसाची #तीर्थक्षेत्र_पाडळी येथील ग्रामदैवत #श्री_भैरवनाथ_मंदिरा मधील #दख्खनचा_जोतिबाराजा_च्या_रुपातील केलेली महापूजा.🌸*
*🙏🏻 #शुभ_सकाळ🙏🏻*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
* #ठिकाणः- #तीर्थक्षेत्र_पाडळी*

12/06/2021

पाडळी गावात माझा डॉक्टर संकल्पनेचा यशस्वी सुरवात:

सातारा:
मा.मुख्यमंत्री यांच्या माझा डॉक्टर या मोहिमेंतर्गत पाडळी (निनाम), ता. जि. सातारा गावात (माझा गाव माझा डॉक्टर) हि संकल्पना राबवन्यात आली. त्यासाठी पाडळी गावचे असलेले परंतु बाहेरगावी वैद्यकीय सेवा देणारे प्रसिद्ध *डॉ श्री अर्जुन शिंदे (कोल्हापूर), डॉ श्री प्रशांत देशमुख (पुणे), डॉ श्री संभाजी ढाणे (नागठाणे), डॉ श्री संजय शेलार (सातारा), डॉ रवींद्र ढाणे (सातारा), डॉ अभय ढाणे (पाडळी), डॉ संभाजी ढाणे (,पाडळी) आणि डॉ. ज्ञानदीप निकम (पाडळी)* यांनी संपुर्ण गावात आणि घरोघरी जावुन जनजागृती केली. कोरोना संदर्भात पाडळी गावातील नागरिकांना मानसिक आधार देऊन, घ्यायची काळजी याचे मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टरांची टीम ने पूर्ण गावात मार्गदर्शन केले आणि संसर्ग झालेल्या घरी जाऊन संशयित लोकांची तपासणी केली. यासाठी गावातील परिचारिका आणि आशा सेविका व इतर कर्मचारी वर्गाचे साहाय्य मिळाले. या उपक्रमा साठी सर्व ग्रामस्थ तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कोरोना कृती समिती पाडळी चा मोलाचे सहकार्य मिळाले.

या उपक्रमाला पाडळी गावातील श्री दिलीप घोरपडे बंधू यांच्या संकल्पनातुन चालना मिळाली.

पाडळी येथील कोवीड कक्षास मदत..!
12/06/2021

पाडळी येथील कोवीड कक्षास मदत..!

काल पाडळी येथील कोवीड विलगीकरण कक्षास टाॕप गियर उद्योग समुह , सातारा चे डायरेक्टर श्री. शशिकांत पवार साहेब यांनी भेट देव...
09/06/2021

काल पाडळी येथील कोवीड विलगीकरण कक्षास टाॕप गियर उद्योग समुह , सातारा चे डायरेक्टर श्री. शशिकांत पवार साहेब यांनी भेट देवुन सध्याच्या परिस्थिती वर चर्चा केली तसेच सुचना दिल्या होत्या व या विलगीकरण कशास ठोस व भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले होते त्या अनुशंघाने आज मा.श्रीकांत पवार ( मॕनेजिंग डायरेक्टर , टाॕप गियर उद्योग समुह ) यांचे उपस्थितीत दहा बेड , वाॕटर गिझर , गरम पाणी जार ,PPE किट व ईतर उपयोगी साहित्य आपल्या गावास दिले व गरज पडलेस आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले. या कोरोनाच्या बिकट व अडचणीच्या काळात केलेल्या या मदती बद्दल टाॕप गिअर उद्योग समुहाचे पाडळी ग्रामस्थांतर्फे आभार..!
यावेळी सरपंच महेश ढाणे व ग्राप सदस्य श्री अशोक ढाणे तसेच श्री. भुषण ढाणे , कॕ.विक्रम ढाणे,श्री .विशाल ढाणे श्री.नितीन ढाणे यांची उपस्थिती होती. या मदतकार्यात मा.वसंतराव जाधव ( माजी पोलीस अधिकारी )यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच देवजी पाटील युवा मंडळ ,दादा पाटील मिञ मंडळ ,पांडुरंगकृपा संस्था , कोरोना समिती , डाॕक्टर्स नर्स स्टाफ ,आशा सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

26/04/2021

पाडळीचं पाडळकर
निघालं मानानं मिरवीत...
नावजीबुवा किवळकर
वसा भक्तीचा गिरवीत...

25/04/2021

शतकाच्या या परंपरेची चक्रे आज थांबली दूर राहीला उत्सव सारा स्तब्ध वाडी रत्नागिरी
नाथ केदारा दया कर रे दयाळा पुन्हा अशी चैत्र पौर्णिमा कधीही ना येवो जिथे ना गुलालाची उधळण नाही .प्लेगच्या साथीत ही मोठया उत्साहात चैत्र यात्रेची शोभा वाढवणारी पाडळी गावाची जोतिबा देवाची पहिली मानाची काठी नाही सुंद्री हलगीच्या तालावर नाचणाऱ्या सासनकाठ्या नाहीत आनंदात तल्लीन भक्त नाहीत. कृपाघना आता तरी हे संकट घालव आणि पुन्हा एकदा दाखव आनंद उत्साह आणि चैतन्यानं भरलेला तुझा हा रत्नागिरी पर्वत..
जोतिबाच्या नावाने चांगभलं...सौदागराच्या नावानं चांगभलं

कोरोना च्या पार्श्वभूमीवर श्री जोतिबा चैञ याञा मोजके श्री पुजक , देवसेवक व सासनकाठी मानकरी यांच्या उपस्थित सर्व प्रशासकी...
24/04/2021

कोरोना च्या पार्श्वभूमीवर श्री जोतिबा चैञ याञा मोजके श्री पुजक , देवसेवक व सासनकाठी मानकरी यांच्या उपस्थित सर्व प्रशासकीय नियम पाळुन पार पडावी यासाठी श्री नाथकेदार समुहाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी व प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

" वडील " हा आधार तुम्हाला प्रत्येक वेळेला जाणवणार , कारण समाजात राहताना वडिलांसारखा मान कमवता कमवता पोरांचं सगळं आयुष्य ...
14/03/2021

" वडील " हा आधार तुम्हाला प्रत्येक वेळेला जाणवणार , कारण समाजात राहताना वडिलांसारखा मान कमवता कमवता पोरांचं सगळं आयुष्य जातं.
#बापमाणूस

 िला_खेटा गेल्या वर्षी किमान पहिले तरी खेटे झाले पण यंदा सगळे खेटे मनानेच पार करायचे! खेटा म्हणजे काय तरी पुन्हा पुन्हा ...
28/02/2021

िला_खेटा
गेल्या वर्षी किमान पहिले तरी खेटे झाले पण यंदा सगळे खेटे मनानेच पार करायचे! खेटा म्हणजे काय तरी पुन्हा पुन्हा एखाद्या जागी जाणं म्हणजे खेटे घालणं हे जाणं म्हणजे निरूद्देश जाणं येणं नाही तर आपली विनंती मान्य व्हावी म्हणून केलेलं आर्जव म्हणजे खेटा. नाथांची ही यात्रा प्रत्यक्षच केली पाहिजे असं नाही चला यंदा हे पाच खेटे मनाने करू !
पहिला खेटा नाथांच ध्यान वर्णन समजून घेण्यासाठी
देवांचा ध्यानमंत्र जो परंपरागत पद्धतीने म्हणला जातो तो असा..
ध्यायेत् देव परेशम् त्रिगुण गुणमयम् |
ज्योतिरूपम् स्वरूपम्
वामेपात्र त्रिशूलम् डमरू सहितम् खड्गदक्षेविराजम्
शेषारूढम् सुरेशम् क्रमणपदयुगम्
भक्तकारुण्यगम्यम्
सर्वांगेलिंगभूषम् उपवितसहितम् नाथ मार्गाधिपत्यम्
दैत्यघ्नम् भक्तपालम् सकलमघहरम् ज्ञानमानंदचित्तम् सर्वार्थं सर्वरूपम् अगुणसगुणदम् श्रीपदनाथरुपम्
त्या देवाचे ध्यान करतो जो परा वाणीला अगम्य आहे त्या परेचा ईश्र्वर आहे. जो सत्व रज आणि तम या तिघांनीही युक्त असा सगुण होऊन ज्योती स्वरुपात साकार झाला ज्यानं डाव्या हातात अमृत पात्र आणि त्रिशूळ धारण केला आहे तर उजवीकडे डमरू आणि खड्ग धारण केले आहे, ( दक्षे चा दुसरा अर्थ सज्ज असाही घेता येईल)
जो शेषावर विराजमान आहे( वास्तविक नाथ क्रमणपद उभे आहेत. जगातील कोणतही आसन शाश्वत नाही आणि करवीर भूमीच्या रक्षणार्थ सदैव सज्ज असे नाथ नागजंघासन नावाच्या आसनावर उभे आहेत.) देवांचा स्वामी, क्रमण म्हणजे एक पाय पुढे टाकून उभा आहे. जो केवळी भक्ती आणि करूणेनेच कळू शकतो ज्याच्या सर्व शरिरावर शिवलिंगाच्या मुद्रा आहेत ( सं. केदार विजय द्वादश लिंगांकित शरीरा) यज्ञोपवीत अर्थात जानवे आहे असा अनादि सिद्ध योगी जनांच्या नाथ मार्गाचा प्रमुख अधिपती आहे.
मी त्या श्रीनाथाच्या चरणांच चिंतन करतो जे दैत्यांचा संहार करतात भक्तांच पालन करतात सर्व पापांचा नाश करून ज्ञान आणि मनाला अखंड आनंद देतात, जे चारी पुरूषार्थ देतात जे सर्वदेवमय आहेत अगुण ( निर्गुण ) किंवा सगुण अशा कुठल्याही रुपाचा अनुभव देऊ शकतात
नाथांच्या रुपाचं वर्णन करणाऱ्या श्र्लोकांच्या पूर्वार्धानंतर उत्तरार्ध पुढच्या खेट्याला तोवर ही मानसयात्रा नाथ केदार चरणी समर्पण
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकः

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3634224670000634&id=2117856434970806पुढारी कस्तुरी क्लब आणि मे. पुरुषोत्तम न...
07/02/2021

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3634224670000634&id=2117856434970806
पुढारी कस्तुरी क्लब आणि मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी आयोजित ब्लॅक मॅचिंग स्पर्धा
विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स करा🙏🙏

पुढारी कस्तुरी क्लब आणि मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी आयोजित ब्लॅक मॅचिंग स्पर्धा

पावक्ता येथे आज काढण्यात आलेली रांगोळी..!
28/01/2021

पावक्ता येथे आज काढण्यात आलेली रांगोळी..!

22/12/2020

श्री तीर्थक्षेत्र पाडळी ता. जि. सातारा या चैत्र यात्रेत प्रथम क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीला यंदा ११तोळ सोण आणि २किलो चांदीचा साज करण्यात आला आहे.

Address

श्री श्रेत्र पाडळी
Satara
415519

Alerts

Be the first to know and let us send you an email when आम्ही पाडळीकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आम्ही पाडळीकर:

Videos

Share

Category