Ankur Vidyamandir

Ankur Vidyamandir As a part of COER, Ankur Vidya Mandir is based on the ideology of ‘inclusion’ and equality in ed Started in 1988, Ankur Vidya Mandir is more than just a school.
(1)

It is a home away from home for all its 237 children. At Ankur, we want our children to feel comfortable enough to express themselves. We encourage them to say what’s on their mind without feeling ashamed or embarrassed. We allow them to progress at their own rate, but at the same time, we inspire them to be the best they can. At Ankur, we try our best to make every child feel special. We don’t be

lieve in comparison with others; we only want our children to compete with themselves. Along with academic knowledge, we also try to impart moral values. We want your child to write their alphabets, and at the same time, we also want them to know that they must not look into their neighbour’s answer book if they don’t remember a spelling. To us, their physical development is also as important as their academic and moral progression. A child must be healthy and sickness free. So we will push a child if its laziness he’s exhibiting, and we will spur on a child who shows aptitude. And we will, at the foremost, ensure the safety and well being of your child. We want to instill a sense of confidence in your child. We want to create strong, positive and independent individuals. We want schooling (or the educational journey as we like to call it) to be a wholesome experience. And we try to make it as fun and as interesting as possible. We want your child to look forward to going to school instead of having ‘pretend’ stomachaches every morning.

12/03/2024
25/07/2023

search SMC pune

03/07/2023
30/06/2023

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अंकुर विद्यामंदिर येथे पालखी सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला.

10/05/2023
नमस्कार,अंकुर दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण या शाळ...
18/01/2023

नमस्कार,

अंकुर दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण या शाळेचा भाग आहातच म्हणूनच आपली उपस्थिती या कार्यक्रमासाठी प्रार्थनीय आहे.

आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी व्हावे ही विनंती.

शुक्रवार दिनांक - २० जानेवारी २०२३

सायंकाळी - ४ ते ५.३०

आपली कृपाभिलाषी

अमृता जोशी

मुख्याध्यापिका - अंकुर विद्यामंदिर

12/01/2023

bhogichi bhaji

06/01/2023

०४ जानेवारी २०२३ हा दुःखाचा दिवस....

सौ.सुमित्रा माधव भंडारी म्हणजे पूर्वाश्रमीच्या वासंती वेलणकर ह्यांचं अल्पशा आजारानं पुण्यात दुःखद निधन झालं.

सौ.सुमित्रा भंडारी ह्या परभणीच्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक कै.नानासाहेब वेलणकर यांच्या कन्या. भाजपाचे जेष्ठ नेते राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीशजी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक डॉ.गिरीश वेलणकर यांच्या त्या भगिनी होत.सौ.*सुमित्रा माधव भंडारी* यांचं असं अचानक आपल्या सर्वातून निघून जाणं हे मनाला अतिशय वेदना देणारे आहे.

एक अभ्यासू नेता अशी ज्यांची देशपातळीवर ओळख आहे ते म्हणजे माधव भंडारी साहेब.

माझी त्यांच्याशी झालेली भेट हृदयस्पर्शी होती. माझे वडील मोठ्या आजाराशी झुंज देत मुंबईतील लीलावती हॉस्पिटलला उपचार घेत होते. त्यावेळी मला भेटायला येणारे पहिले व्यक्ती म्हणजे माधव भंडारी साहेब होय. मी हॉस्पिटलच्या बाहेर त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. माझ्यासोबत बसून त्यांनी माझ्या पाठीवर अर्धा तास हात फिरवून मला त्या प्रसंगी धीर दिला. एखाद्याच्या प्रति सहानुभूती व्यक्त करणं थोडंसं सोपं असतं परंतु समानुभुतीने सदाभाऊच्या दुःखात सामील होणारा सहृदयी माधव भंडारी नावाचा माणूस मला त्यावेळी त्यांच्यात दिसला."सदाभाऊ, डॉक्टर चांगले आहेत,वडिलांना काही कमी पडणार नाही. आपण योग्य तो उपचार करायला लावू.तुम्ही चिंता करू नका". हे उभारी देणारे शब्द मला आजही आठवतात.

त्यावेळी माझ्या खिशात केस पेपर काढण्याइतके सुद्धा पैसे न्हवते. पण माधव भंडारी हे माझ्यासाठी देवदूत बनून उभे राहिले. त्यांनी आपल्या खिशात अलगद हात घातला आणि मूठ भरून खिशात जेवढे पैसे होते ते सगळेच्या सगळे माझ्या खिशामध्ये घातले आणि परत उद्या भेटायला येतो. आपण काळजी करू नका असा धीरही त्यांनी जाताना मला दिला.अशावेळी मला वाटलं खरंच एक *देवदूत* माझ्यासमोर उभा आहे, जो मला आधार देत आहे. अशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती.महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब ( Devendra Fadnavis ) माझ्यामागे सदैव सह्याद्रीप्रमाणे खंबीरपणे उभे राहिले. फडणवीस साहेबांनी माझ्या बापाच्या आजारपणात दाखवलेले औदार्य अन् प्रेम शब्दांत व्यक्त करणे खरंच कठीण आहे. माझ्यावर असलेल्या प्रेमाखातर माझा बाप दवाखान्यात असताना दररोज आपुलकीने माझ्याशी व लीलावतीच्या डॉक्टरांच्या टीमसोबत फडणवीस साहेब बोलत असत याचीही मला आज आवर्जून आठवण येत आहे.

आजवर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये अनेक लोक मला जवळून पाहता आले परंतु कोणत्याही पदाची अभिलाषा न बाळगता संघटन मजबूत करण्यासाठी जीव ओतून कसं काम करावं हे माधव भंडारी साहेबांकडून शिकण्यासारखं आहे.

राज्यामध्ये कुठेही एखादी शेतकऱ्यासंबंधी घटना घडली की,माधव भंडारी साहेब मला पटकन फोन करायचे आणि बोलायचे, "सदाभाऊ तुम्हाला तिथे जाऊन यावं लागतंय". अशीच एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे, बीडमध्ये एका शेतकऱ्याचा उसाचा फड पेटला आणि त्या शेतकऱ्यांनी त्या पेटलेल्या फडामध्ये प्राणाची आहुती दिली. मी तेव्हा #जागर_शेतकऱ्याचा, #आक्रोश_महाराष्ट्राचा यात्रेच्या दौऱ्यावर होतो. त्यांचा मला कॉल आला आणि म्हणाले "सदाभाऊ तुम्हाला बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झालेल्या दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जावे लागेल". भंडारी साहेबांचे हे शब्द ऐकून मी लगेच माझे पुढचे सर्व कार्यक्रम रद्द करत #हिंगोलीहून सकाळी सकाळी #बीड जिल्ह्यात पोहोचलो. शेतकरी कुटुंबाला धीर दिला आणि त्यांचं सांत्वन केलं. मायबाप सरकारकडे त्या शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी हाक दिली.

माधव साहेब हे #उसाचा_प्रश्न असो किंवा #सोयाबीनचा_प्रश्न असो प्रत्येक प्रश्नावरती मार्गदर्शन करतात. एखादा कॅप्टन जसं एखाद्या युद्धात सैनिकाला लढण्याचं बळ देतो अगदी तसंच भंडारी साहेब ह्या राजकिय आणि सामजिक युद्धाच्या मैदानात समर्थपणे उभे ठाकतात अन् प्रेरणा देतात, असे अनेक प्रसंग त्यांच्या बाबतीत सांगता येतील.

असं लढाऊ आयुष्य जगणारा हा माणूस. निष्ठेचा महासागर असणाऱ्या ह्या सज्जन, एकनिष्ठ, देवदूताची धर्मपत्नी त्यांना सोडून जात असताना आमच्याच कुटुंबातील एक व्यक्तिमत्व देवा घरी जात आहे, ह्याचं तर दुःख आहेच परंतु हे दुःख पचवताना फार मोठया यातना भंडारी साहेबांच्या मनाला होत असतील ह्यात मात्र शंका नाही. ' #नटसम्राट' या कुसुमाग्रजांच्या नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर आपली पत्नी कावेरीस उद्देशून म्हणतात,"कावेरी,बायको हे एक बंदर असतं, नवरा या गलबतासाठी". आता हा पत्निरुपी किनारा गलबतरुपी भंडारी साहेबांना सतत पत्नीच्या रम्य आठवणींची सतत जाणीव करून देईल.

भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीमध्ये फार मोठं संघटन कौशल्य असणारं हे व्यक्तिमत्त्व. संघटनेसाठी आपल्या घरादाराकडे पाठ फिरवून आपल्या पत्नीच्या खांद्यावर संसाराचा गाडा देऊन संघटनेसाठी माधव भंडारी साहेब #महाराष्ट्रभर फिरत राहिले. महिना महिनाभर घरादारापासून दूर राहिले त्यावेळी त्यांच्या धर्मपत्नीने कुठलीही उणीव त्यांच्या कार्यामध्ये पडू दिली नाही. खंबीरपणे ती माऊली त्यांच्या पाठीशी उभी राहिली. त्यांच्या पक्षसेवेत पत्नीचा खूप मोठा वाटा होता. हा वाटा अखंड महासागरा इतका आहे. अशा #सुमित्रा_ताईच्या (पत्नीच्या) जाण्याने माधवजी ह्यांना जग सुनं सुनं वाटेल याबद्दल मनामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही. ह्या दुःखाच्या महासागरातून त्यांना पुढील आयुष्य धीरोदत्तपणे जगण्याचं बळ मिळो. अशी मी ईश्वरचरणी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीने, महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार यांच्यावतीने प्रार्थना करतो.

माय माऊली सुमित्रा भंडारी ह्यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली मी अर्पण करतो.
🙏🏻🙏🏻

- सदाभाऊ खोत

06/09/2022

ज्ञानप्रबोधिनी ढोलताशा पथक पुणे यांचे अंकुर विद्यामंदिर पुणे येथे स्थिर वादन.......

Address

Gate No. 1, Bungalow No 2, Fergusson College Campus, F. C. Road, Shivajinagar
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankur Vidyamandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ankur Vidyamandir:

Videos

Share