10/01/2024
नार्वेकरांच्या निकालाने सत्ता असली की काहीही करता येते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पैशातून सत्ता आणि सत्तेमधून परत पैसे असे हे दुष्ट चक्र सुरू राहते. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला पक्ष.. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांना ते पक्ष प्रमुख करून गेले. महाराष्ट्रातील अगदी शेम्बडे पोर सुद्धा हे सांगू शकेल. जर मी एखाद्या शेतात 10-12 मजूर घेऊन कामाला गेलो आणि उद्या ते शेत माझेच म्हणून जर कोर्टात गेलो तर शेत माझे होईल का?? बर हे सगळे महाभारत नंतर होईल पण ज्या शेत मालकाने मला कामाला ठेवले त्याच्याशी अशी गद्दारी मला शोभेल का??? अगदी सामान्य जनतेतून आलेलो मी मला त्यांनी पोटाला लावले, गडगंज संपत्ती मी त्या शेताच्या भरवशावर कमावाली, त्यांच्याच शेतावर असा हक्क सांगणे माझ्या नैतिकतेला तरी शोभेल का?? जर आम्ही कष्टकरी इतका विचार करत असू तर राज्याचे मंत्री पद उपभोगलेल्या लोकांनी काय करायला पाहिजे??
संसदेमध्ये भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब एकदा म्हटले होते , संसद मधील खासदार हे सर्व देशाचे प्रतिनिधित्व करतात तर सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करतात त्या अर्थाने सभापती हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. हे वाक्य तंतोतंत राज्याच्या सभागृहाला सुद्धा लागू पडते .. पण कायदा, संसद , नियम , तत्व, परंपरा आणि प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी कोळून पिलेल्या भाजपायी ना ना कसली शरम ना लज्जा.
नार्वेकरांचा निकाल अनपेक्षित अजिबात नव्हता..मागच्या 8 दिवसातील सत्ताधाऱ्यांची वक्तव्य बघता यापेक्षा वेगळा निकाल असणारच नाही हे माहिती होते.
येनाऱ्या निवडणुकीत जर जनतेने शहाणपणा दाखवला नाही तर कदाचित हीच शेवटची निवडणूक असू शकते..
आम्ही परत 1947 च्या आधीपासून सुरवात करू शकतो..
पण नशिबाने त्यावेळी पंडित नेहरू सारखा दूरदृष्टीचा पंतप्रधान आम्हाला मिळाला होता. जर निवडणुकाच झाल्या नाही तर आपले सर्वांचे भविष्य हे अंधारातच आहे.. हे नक्की..