Konkani Ranmanus Ecotourism

Konkani Ranmanus Ecotourism Konkani Ranmanus is a tour organising entity.
(17)

02/04/2024

‘कोकणी रानमाणूस’ होण्याचा प्रवास।Prasad Gawde (रानमाणूस) & DR. ANAND NADKARNI।Full EP

Video Link - https://youtu.be/zyZwOoLXnGY

प्रसाद गावडे हा कोकणच्या निसर्गात वाढलेला तरुण. निसर्ग आणि माणूस यांचा
Co-Existence आणि निसर्गाशी एकरूप होत, सहा ऋतूंचे सहा सोहळे साजरे करणारा कोकण अनुभवत प्रसाद लहानाचा मोठा झाला. पुढे engineering चे शिक्षण घेण्यासाठी काही काळापुरता तो मराठवाड्यात राहिला. एकीकडे निसर्गाने भरभरून दिलेला कोकण आणि दुसरीकडे मानवनिर्मित दुष्काळ त्याने तिथे अनुभवला. शिक्षणानंतर काही काळ त्याने नोकरी देखील केली. परंतु प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडताना पाहून तो अस्वस्थ झाला. आणि मग कोकणात परत जाऊन तिथल्या माणसांचं जगणं जगासमोर आणत ‘रानमाणूस’ होण्याचा त्याचा प्रवास सुरु झाला. या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊ प्रसाद गावडे आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून......................................................................................................
Our Recent Uploads:
https://youtu.be/7OUywfluMOw - कृषिभूषण कमावलेली शेतकरी आणि उद्योजिका
https://youtu.be/sBkchtvsE04 - कथा बंडखोरीची
https://youtu.be/lp2y7QdwD7g - संविधान जगणारा कलाकार
https://youtu.be/xST8RllWutA - संविधानाची ताकद .....................................................................................................

31/03/2024

Join Us in Discovering the Spiritual Essence of Sacred Trees 82756 20518 Ranmanus team for community living workshops

18/03/2024

आयुष्यभराची कमाई जमिनीत गुंतवली | जल जंगल आणि जमीन |Slow Living

10/03/2024

कोकणी माणसा तुझी राजकीय भूमिका काय??

03/03/2024

थोडे स्लो होउया..मशीन सोबत Disconnect होऊन निसर्गाशी Reconnect होऊया

https://youtu.be/Y67moEcK_tk?si=YZUmklqY28DfJlQ0मी जगलेले कोकण....
26/02/2024

https://youtu.be/Y67moEcK_tk?si=YZUmklqY28DfJlQ0

मी जगलेले कोकण....

शिवम प्रतिष्ठान, घारेवाडी आयोजितबलशाली युवा हृदय संमेलन २०२४ मा. प्रसाद गावडे कोंकणी रान माणूस विषय - शाश्वत पर्य....

20/02/2024
10/02/2024

ह्या शेतकऱ्यांनी सुरु केलेय "कोकणातले सगळ्यात सुंदर बोटिंग" | पोय बोटिंग | Experience The silence

Slow Living मध्ये सहभागी होण्या साठी खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करा

https://forms.gle/E6G9vVPk8THRugg58

contact
82756 20518 / omkar kundekar ranmanus

07/02/2024
23/01/2024
16/01/2024
26/12/2023

झऱ्यांच्या पाण्यावर केली जाणारी वायंगणी शेती ....

13/12/2023
11/12/2023
20/11/2023
19/11/2023
19/11/2023
27/10/2023

Experience by communities with Ranmanus ...

13/10/2023

पारंपरिक मच्छिमारांसोबत Community Fishing चा अनुभव | The Fishermen Village

06/10/2023

आपलीही शहरे फॉरेन सारखी स्वच्छ सुंदर बनु शकतील ? स्वच्छतेचा "वेंगुर्ला पॅटर्न"

01/10/2023

कोकणातला गणेशोत्सव का खास आहे ? लाखो चाकरमानी गावी का येतात ?

22/09/2023

*माटी बांधल्यात काय रे*?
☘️🌿🍁🍒🥥🥒🍎🌰

माटी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची माटी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.
कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे. आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्‍या बहाराने ते अजून नटून जाते. माटी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटीमध्ये केला जातो.

माटीमधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ, शिप्टा आणि तवसा.

1) *आंब्याचे टाळे* :- आंबा
Mangifera indica (Anacardiaceae)
माटीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळे म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळे फक्त आंबोलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही.

2) *केवणीचे दोर* (किवनीचे दोर) :- केवण / मुरडशेंग
Helicteris isora (Malvaceae)
आंब्याचे टाळे किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधी #सानशी तील एक आहे.

3) *उतरलेला नारळ* :- नारळ / माड
Cocos nucifera (Arecaceae)
माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो.

4) *शिप्टा (कातरो)* :- सुपारी / फोफळ
Areca catechu (Arecaceae)
शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो.

5) *तवसा (काकडी)* :- काकडी
Cucumis sativus (Cucurbitaceae)
काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते.

यांशिवाय माटी रंगीत व आकर्षक दिसावी म्हणून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या इतर जंगली वनस्पतीही माटीत वापरल्या जातात. यात हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी, नरमाची फळे व नागकुड्याची फळे यांचा समावेश होतो.

6) *हरण (हराण)* :- सोनकी
Senecio bombayensis (Asteraceae)
सोनकी हे एक लहान रोपट असते. त्याला आकर्षण पिवळी फुले येतात. पावसाळ्यात कोकणातील सडे हरणाने भरुन जातात. माटीमध्ये हरण प्रामुख्याने बांधले जाते.

7) *कवंडळ (कौंडाळ)* :- कवंडळ
Trichosanthes tricuspidata (Cucurbitaceae)
कवंडळ ही एक वेल असते. त्याला पावसाळ्यात पांढरी फुले व लाल गोलाकार फळे येतात. ही कवंडळ फळे माटीत वापरली जातात. त्यामुळे माटी अजून रंगीत बनते.

8) *कांगणे (कांगले)* :- कांगुणी
Celastrus paniculatus (Celastraceae)
कांगुणी ही एक वेल असते. त्याला गोलाकार पिवळी-केसरी फळे येतात. कांगणीच्या फळांचे घोस माटीत बांधले जातात.

9) *सरवड (शेरवाड)* :- सरवड
Mussaenda glabrata (Rubiaceae)
सरवड ही एक आधाराने वाढणारे झुडूप आहे. याला भगवी फुले येतात तर याची नवीन पाने पांढरी असतात. त्यामुळे ही पाने माटीत वापरतात.

10) *आयना* :- ऐन / असन
Terminalia elliptica (Combretaceae)
ऐन हे इमारती लाकडाचे झाड. ऐनाची फळे (आयना) पाच पदराची जरा विचित्रच आकाराची असतात. त्यांचे घोस माटीला बांधले जातात.

11) *तेरडा (तिरडा)* :- तेरडा
Impatiens balsamina (Balsaminaceae)
पावसाळ्यात बहरणाऱ्या फुलांपैकी एक लहान झाड तेरडा. याची गुलाबी फुले माटीला सुंदर दिसतात.

12) *वाघनखी* :- कळलावी / वाघनखी
Gloriosa superba (Colchicaceae)
वाघनखी ही वेलवर्गीय कंदमुळ वनस्पती. याची आगीसारखी दिसणारी लाल-भगवी-पिवळी फुले माटीत अजुन रंग भरतात.

13) *नरमाची फळे* :- नरम / बोंडारा
Lagerstroemia parviflora (Lythraceae)
नरम हे एक मध्यम आकाराचे झाड. याची फळे काही ठिकाणी माटीला वापरली जातात.

14) *नागकुड्याची फळे* :- नागकुडा
Tabernaemontana alternifolia (Apocynaceae)
नागकुडा हे एक मध्यम झाड. याला तगरीसारखी पांढरी फुले येतात. तर याची पिवळसर केसरी वाकडी फळे माटीत वेगळी दिसतात. काही ठिकाणी यांना वाघनख असे म्हटले जाते.

माटी ही कोकणची एक वेगळीच संस्कृती आहे. निसर्गातच आढळणाऱ्या वनस्पती वापरून माटी सुंदर सजवली जाते. यासंबंधात आळस न करता, आपण ही संस्कृती जपली पाहिजे. आता तर या वनस्पती बाजारात सहज उपलब्ध असतात.

लेखक : नितिन कवठणकर

🙏🙏
Matoli is an excellent exhibition of the seasonal biodiversity, which transmits the traditional knowledge of local flora from one generation to another, and also to develop love and respect for the biodiversity...

Address

Savantvadi
416531

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

7038681978

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Konkani Ranmanus Ecotourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus is a group of nature lovers who organise tours in a different and innovative way. We organise tour within Konkan region. Konkan Region is Western Coast of India it's from Gujrat To Kerala. Its occupied by Arabian sea and Sahyadri mountains. We are working or representing one of its beautiful part that is Sindhudurg District of the Konkan region. It is situated on the coastal border of Goa and Maharashtra. Sindhudurga has Its own language and unique cultural heritage called Malvani. Konkani Ranmanus is Local Nature Man who is spending his life in the rural part of Konkan in jungles in a beautiful muddy house in farms surrounded by trees flowers lakes and rivers. We take you to these activities with Konkani Ranmanus from Jungles of the Western Ghats to the Blueish white sanded Arabian sea.Tourist visiting Konkan and Goa can take live experiences of such cultural, traditional, natural, artistic, sporty, adventures activities.They can live like a Nature Man and enjoy being wild.

Nearby travel agencies


Other Savantvadi travel agencies

Show All

You may also like