07/02/2024
Kinnaur Valley Sightseeing Tour...
19-25 मे 2024 (Ex- Chandhigarh)
किन्नौरकडे जाताना...
काळ्याकभिन्न आणि रांगड्या सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले आम्ही. त्याच्याच अंगाखांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो. त्याच्या राकट पण तितक्याच कणखर हातांनी आम्हाला तोलून धरले गेली कित्येक वर्ष. त्यामुळे सह्याद्रीचे प्रेम खास असलं तरी हिमालयाची शिखरे मात्र सतत खुणावत राहिली. पुस्तकातून वाचलेला, तिथल्या स्थानिकांच्या तोंडातून ऐकलेला हिमालय तिथे जायला लागल्यापासून अधिकाधिक कळत, उमगत गेला.
उत्तरेला भारतीय सीमेची चौकट लंघून पाकिस्तानात काराकोरम रांगामधून पुढे हिंदुकुश पर्वताला जाऊन भिडणारा हा हिमालय भारताला अत्युच्च सौंदर्य प्रदान करतो. चंदीगढ कडून सोलन- शिमला मार्गे किन्नौरकडे जाताना शिवालिक टेकड्या वेगाने मागे सरकत जातात आणि मध्य हिमालयाच्या बर्फाच्छादित पिर पंजाल रांगा दिसू लागतात. खोल तळाशी वाहणारी सतलज, उतारावर सफरचंद आणि चेरीच्या बागा आणि खडे देवदार,ओक तुमच्या पुढील प्रवासाचे सोबती आसतात. माणूस आणि निसर्ग आजही इथे एकोप्याने जगत आहेत याची जाणीव तुम्हाला पुढच्या प्रत्येक क्षणी होत रहाते.
एकाबाजूला खळाळत वाहणाऱ्या सतलजला साक्षी ठेवून अरूंद रस्त्यावरून आपला पुढील प्रवास सुरू होता. किन्नौरचे वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला उंचच उंच पर्वत रांगा आणि दुसऱ्या बाजूला काळजात धस्स होईल इतक्या खोल दऱ्या. अप्पर किन्नौरचा भाग ट्रान्स हिमालयीन श्रेणीत आहे. किन्नौरमध्ये तीन समांतर पर्वतरांगा आहेत. ईशान्येला झंस्कर श्रेणी आहे जी किन्नौरची तिबेटशी असलेली पूर्वेकडील आंतरराष्ट्रीय सीमा आहे. मुख्य ग्रेट हिमालयीन श्रेणी वायव्येकडून दक्षिणेकडे पसरली आहे. तर धौलाधर श्रेणी किन्नौरची दक्षिण सीमा आहे.
अंगवर येणारी किन्नौर कैलाशची शिखरं उशाला घेऊन आपण झोपी जातो. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात सूर्याची सोनेरी किरणे त्याला सोनसळी अभिषेक घालतात आणि लक्ख पांढरा, तेजस्वी किन्नौर कैलाश सोन्याची प्रभा आलेला, ध्यानाला बसलेला जणू तपस्वी वाटू लागतो. त्यांची उत्युंगता आपला खुजेपणा अजूनच अधोरेखित करत असते.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर मेसेज किंवा कॉल करा अथवा मेल करा.
90825 52716
theplanetcanopy1gmail.com