Tunga Trekkers

Tunga Trekkers Mumbai based Trekking group. We are dabbling with Community Development Programs and Student-Athlete
(5)

रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद, ऐश्वर्य, सुख संपत्ती लाभो.. रमजान ईद मुबारक..!ईद घेऊन येई आनंद, जोडू मनामनांचे ...
11/04/2024

रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद, ऐश्वर्य, सुख संपत्ती लाभो.. रमजान ईद मुबारक..!
ईद घेऊन येई आनंद, जोडू मनामनांचे बंध, सणाचा हा दिवस खास, ईद मुबारक तुम्हा सर्वांस..! बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद.



Contact following trek leaders .
DADAR Mumbai :- 91371 17374
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Join us ⛰️🧗‍♂️🤟

Tunga Trekkers
______________________________

💪




सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्ष सर्वांना सुख आणि समाधानाचे जावो. 🚩☎️ Contact following trek leaders...
09/04/2024

सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्ष सर्वांना सुख आणि समाधानाचे जावो. 🚩

☎️ Contact following trek leaders to confirm your seats:
Mum :- 91371 17374
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Join us ⛰️🧗‍♂️🤟

Tunga Trekkers
______________________________

💪






कर्नाळा किल्ल्याची गडदेवता श्री कर्णाई देवीचे मंदिर.
08/04/2024

कर्नाळा किल्ल्याची गडदेवता श्री कर्णाई देवीचे मंदिर.



महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस…दि– ३ एप्रिल इ. स. १६८०.हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे,🙏🏻छत्रपती शिवाजी महार...
03/04/2024

महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस…
दि– ३ एप्रिल इ. स. १६८०.
हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे,🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराजांचे
किल्ले रायगडावर निधन…
छत्रपतींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन…
🙏🏻💐

Tunga Trekkers

🚩

होळी सण म्हणजे हिवाळ्याच्या समाप्तीचा व वसंत ऋतूचा प्रारंभ. आपण जर निसर्गाला जपले तर निसर्गही आपल्याला जपेल. निसर्गाचा ह...
25/03/2024

होळी सण म्हणजे हिवाळ्याच्या समाप्तीचा व वसंत ऋतूचा प्रारंभ. आपण जर निसर्गाला जपले तर निसर्गही आपल्याला जपेल. निसर्गाचा हाच बदल माणसाने स्वीकारावा. उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक प्रणाम करून सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🔥🛐

Wish you and your family a colourful and fun-filled Holi!!! 🚩

☎️
091371 17374 join us


नवीन उपक्रम. 🕉️तुंगा trekkers आणि भिमाशंकर  अभयारण्य हे नातं अतूट आहे. आम्हा तुंगा ट्रेकर्सनां डाकिनी भिमाशंकर ने खुप का...
21/03/2024

नवीन उपक्रम. 🕉️

तुंगा trekkers आणि भिमाशंकर अभयारण्य हे नातं अतूट आहे. आम्हा तुंगा ट्रेकर्सनां डाकिनी भिमाशंकर ने खुप काही दिले आहे. सह्याद्रीच्या दर्याखोर्यातील आदिवासी बांधव हे तर रक्ताच्या नात्यापपेक्षा घट्ट असं समीकरण.

त्यांच्यात राहून वावरून त्यांना आपलं मानून जे काही करता येतं ते आम्ही वारंवार करत असतोच. त्यात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण हे खास जिव्हाळ्याचे विषय. आणि हे एकट्यादुकटृया व्यक्ती किंवा संस्थेचे काम नाहीच तर बरेच हात एकत्र येत असतात.

यंदा महिला दिनाचे औचित्य साधून केलेल्या "जैत रे जैत" ट्रेक ला,आमच्याबरोबर आलेल्या सुरक्षा संस्थेने काल भिमाशंकरच्या पायथ्याशी पाथरज गावी सदिच्छा भेट देऊन तेथील आश्रमशाळेतील मुलीकरता sanitary pad vending machine आणि pads उपलब्ध करुन दिले.

संस्थेमार्फत मुलींशी संवाद साधून त्यांशा menstrual health n hygiene बाबत मार्गदर्शन करताना सोप्पी योगासनेही शिकवली.

खास नमुद करण्यासारखी गोष्ट म्हणजे उपलब्ध केलेले product 100% eco friendly and bio degradable असून top rated amongst market peer आहे. अजून कुणाला वैयक्तिक वा संस्थाअंतर्गत ह्या किंवा अश्या इतर उपक्रमाला हातभार लावायचा असेल तर जरूर संपर्क करा.

085915 52406
091371 17374








"प्रिय मैत्रिणींनो,*"आज लिंगोबा , गोनीदा आणि स्मिता भरून पावले असतील."**जैत रे जैत* हा निव्वळ कादंबरी किंवा चित्रपट नसून...
20/03/2024

"प्रिय मैत्रिणींनो,

*"आज लिंगोबा , गोनीदा आणि स्मिता भरून पावले असतील."*

*जैत रे जैत* हा निव्वळ कादंबरी किंवा चित्रपट नसून नारि शक्तीच्या जागराचा हुंकार आहे.

महिला दिन विशेष ट्रेक जो आपण स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ लिंगोबाचा डोंगुर कर्नाळा येथे साजरा केला आणि तुम्ही सर्वांनी दाखवलेला उत्साह हा खरच कौतुकास्पद होता त्यासाठी तुम्हा प्रत्येकाचे आभार. तुमची उपस्थिती महिलांच्या सामर्थ्याचं आणि आत्मविश्वासाचं एक उदाहरण होत. ऊन माथ्यावर असताना लिंगोबाचा डोंगुर माथा लिलया गाठला आणि यातच आम्हाला चिंधी गवसली... आणि आम्ही आशा करतो की डोंगरातून चालताना तुम्ही स्वतः तुमच्यातील शक्तीला शोधल असेल. या प्रवासात अनेक अनुभव नक्कीच असतील, आम्हाला ऐकायला आवडतील.

तसेच हा संपूर्ण प्रवास पूर्णत्वास नेणारे सर्व हात
Tunga Trekkers
Nomad Adventure India
ThrillOFlow व सहकारी आणि आमचे सर्व Sponsors Lavish Kitchen, Suraksha NGO, Avani, Swag Republic, पारिजात, Sai Book Depot यांचे आभार.
🙏🏽



लवकरच नवीन काहीतरी आगळं-वेगळं 🚩

Stay tuned for Our Incoming Theme base Trek😀

Contact us
whatsapp :- ☎️091371 17374


On the occasion of international women's dayTribute to Smita Patil ..स्त्री शक्तीचा जागर... कर्नाळा किल्ला aka लिंगोबाचा...
10/03/2024

On the occasion of international women's day

Tribute to Smita Patil ..

स्त्री शक्तीचा जागर... कर्नाळा किल्ला aka लिंगोबाचा डोंगुर

Salute to All enthusiastic participants.🎉

सविस्तर लवकरच...

Thank u for overwhelming response 😍❤️ registration closed. 🙏🏽
06/03/2024

Thank u for overwhelming response
😍❤️ registration closed.
🙏🏽




खिरेश्वरला गेल्यावर नेहमीच तुझी आठवण येईल..भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐
05/03/2024

खिरेश्वरला गेल्यावर नेहमीच तुझी आठवण येईल..
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐

Women's day Special Hill Trek-10th MarchKarnala Fort aka Lingobacha dongur Dear All, it is our distinct pleasure to intr...
05/03/2024

Women's day Special Hill Trek-10th March
Karnala Fort aka Lingobacha dongur

Dear All, it is our distinct pleasure to introduce our esteemed guest of honor, "Usha Majithia" Mam. With a remarkable career marked by 30 years of journey to empower women with equality & independent living, She truly embodies excellence and leadership in advocacy for women also her Self-Esteem and Action Plan Workshops has helped over 1500 women to improve their confidence and stand strong.

Please join me in extending a warm welcome to Usha Majithia Mam, as we celebrate this Women's Day remember A legendary actress Smita Patil.
listen to Usha Mam about her journey and guiding the Women around at Karnala Fort.

For more details about trek please contact
Sneha -9702640570
Avinash - 9870108525




Tunga Trekkers

Nomad Ventures India

ThrilloFlow

Women's day Special - Trek to Karnala Fort10th March 2024सांगली -कोल्हापूरचा पुराच्या वेळची मदत, दुर्गम भागातील विद्यार्...
26/02/2024

Women's day Special - Trek to Karnala Fort
10th March 2024

सांगली -कोल्हापूरचा पुराच्या वेळची मदत, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दिलवाली दिवाळीचे फराळ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अश्या अनेक सामाजिक कार्यक्रमात तुंगा ट्रेकर्स सोबत एक हाथ नेहमी सोबत असतो तो म्हणजे सुरक्षा trust- एक कोशिश.

Welcome Social cause Partner
Suraksha Trust - Ek Koshish

Suraksha Trust is a 30 year old non profitable trust founded by Shri J.K. Jain, now succeeded by his daughter Mrs. Nilima Jain.

A charitable trust which works for the for education of children , nutrition and wellness and providing help to the needy as well as conducting workshops and seminars and disseminating our knowledge to everyone.

This organisation believes in working for a better tomorrow.

For trek details please click on below link.
https://www.facebook.com/share/p/uCdN7beH68KgBppY/?mibextid=RtaFA8

Tunga Trekkers
Nomad Ventures India
lavish_kitchen_2020
MyAvni

जागतिक महिला दिनानिमित्त…लिंगोबाचा डोंगुर बोलुवतोय..कर्नाळा किल्ला दिसला की आपसुक जैत रे जैत ची गाणी अजून देखील आपण गुणग...
25/02/2024

जागतिक महिला दिनानिमित्त…

लिंगोबाचा डोंगुर बोलुवतोय..
कर्नाळा किल्ला दिसला की आपसुक जैत रे जैत ची गाणी अजून देखील आपण गुणगुणायला लागतो. खास करून आठवते ती चिवट, जिद्दी ,खंबीर अशी चिंधी आणि लिंगोबाचा डोंगुर…

चिंधी ला जसे कोणी डोंगरावर जायला अडवू शकले नव्हते तसे तुम्हाला पण नाही. किती वेळा या ना त्या कारणाने तुम्ही ट्रेकला जाण्यापासून स्वतःला अडवले असेल. त्यातले एक कारण म्हणजे मासिक पाळी (Periods)...
हेच नेमके ध्यानात घेवून यावर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तुमच्या ट्रेकला एक सोबती घेवून आलोय MyAvni जेणेकरून तुमचे बरेच प्रश्नांना उत्तर मिळतील आणि एक वेगळा आत्मविश्वास घेवून तुम्ही पुढील भटकंती पण निर्धास्त पणे करू शकाल.

अवनी हा आपल्या आजी पणजी आणि निसर्ग यापासून प्रेरणा घेवून सुजाता पवार आणि अपूर्व अग्रवाल या दोघांनी चालू केलेला महिलांचा महिलांसाठीचा वेलनेस ब्रँड आहे.
आरोग्यसेवा व्यावसायिकांनी विकसित केलेली सर्व उत्पादने आणि ग्रामीण महिलांनी हाताने तयार केलेली आहेत.
भारतभरातील 1 लाखाहून अधिक महिलांना त्यांचे products आवडते त्यांच्या श्रेणीमध्ये कॉटन सॅनिटरी पॅड, मासिक पाळीचे कप, इंटिमेट वाइप आणि लिक्विड डिटर्जंट यांचा समावेश आहे

www.myavni.com आणि Amazon, Flipkart, One Green, YouCare सारख्या ई-स्टोअरवर खरेदी करा.

Tunga Trekkers Welcomes on board partner "Avni". For the women day special trek on 10th March.

She is an award-winning women’s wellness brand inspired by GrandMoms and Nature.

The key features are:
All products developed by healthcare professionals and Handcrafted by rural women.

Loved by over 1 Lac women across India their range includes
1.natural cotton sanitary pads
2. Reusable menstrual cups
3.Resuable cotton sanitary pads
4.antibacterial intimate wipes
5.bioenzyme based liquid detergents for Period wear.

Buy on www.myavni.com and e-stores like Amazon, Flipkart, One Green, YouCare.

Tunga Trekkers

Nomad Ventures India

जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कर्नाळा किल्ला ट्रेक 10th March 2024.महिला दिनानिमित्त ट्रेकला येणाऱ्या महिलांना एक दिव...
24/02/2024

जागतिक महिला दिना निमित्त आयोजित कर्नाळा किल्ला ट्रेक 10th March 2024.

महिला दिनानिमित्त ट्रेकला येणाऱ्या महिलांना एक दिवस रोजच्या रहाटगाड्यातून थोडा उसंत मिळावाआणि निसर्गात सामील होता यावे त्यासाठी आपल्या सोबत एक आपला travel cm Food partner सोबतीला आहे.
lavish_kitchen_2020

लॅव्हिश कीचन आणि तुंगा ट्रेकर्स च नातं अतूट आहे कोल्हापूर मध्ये आलेला पूर असो व covid मध्ये गरजूला आमचा सूप कीचन चा माध्यमातून जेवण पुरवणं असो , ट्रेक ला जाणाऱ्यांसाठी फूड पॅकेट पुरवणं असो आम्ही नेहमी तुंगा सोबत राहिलो आहे आणि या पुढे देखील राहू धन्यवाद विवेक सर आणि तुंगा पुन्हा एकदा आम्हाला संधी दिल्या बदल मनस्वी आभार.
आपला ऋणी
शेफ विपीन हंकारे
लॅव्हिश कीचन

Lavish Kitchen and Tunga have an unbreakable relationship Be it the floods in Kolhapur or providing food to the needy through our soup kitchen or providing food packets for trekkers we have always been with Tunga and will continue to be with Tunga Thanks again Vivek sir and Tunga Thank you very much for giving us a chance
Regards
Chef vipin hankare
Lavish kitchen

Instagram
https://www.instagram.com/lavish_kitchen_2020?igsh=MW1mcDhnYTNvc3Vscg==

Nomad Ventures India

ThrilloFlow

Vipin Hankare

*Womens Day Special Hill Trail Walk to Karnala Fort aka लिंगोबाचा डोंगुर with memories of चिंधी Legendary Actress Smita ...
22/02/2024

*Womens Day Special Hill Trail Walk to Karnala Fort aka लिंगोबाचा डोंगुर with memories of चिंधी Legendary Actress Smita Patil*

Clebrating Women's Day.... With the Life Moments of Legendary Actress Smita Patil...

Join us on this Women's Day Special walk To the Mountain where she lived forever.

On *Sunday 10 th March 2024*

*💃Costume theme:*
✔A Thakar Girl or Navavari Saree Or
✔Your own Traditional is allowed...!
✔Be it Western... Just Glow
✔ Shoes is a culture remix to wear it proudly...!

💥Many more things going to happen and first 3 winner will be honored.💥

*Schedule:*
🔹 10th March 2024 Meet up @ Dadar TT 6.00 Am.
🔹Bus will start at 6.15 from Dadar.
🔹 Reach Karnala at 8Am. Meet & Greet with Brief the moment.
🔹 Ascend / explore fort / Competition.
🔹 Descend by 2.00pm and Lunch.
🔹 Celebration
🔹 Return Journey by 3.30-4.00Pm.

💸Trek Fee : 300/-*

Includes:*
🔸Transport from Dadar - Dadar
🔸Breakfast Goodie Bag
🔸Karnala Bird Sanctuary Entry Fees
🔸Lunch at Base
🔸& Many more fun gifts for the day.
🔸 Emergency First Aid

*Live The Moment of Her To You*

For more details contact
Sneha - 091371 17374
Avinash -9870108525

Registration link
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScH8JApJwCDNqxImS0QyVi0uGN-gEcZkhBJ3NvBc3RJRxFmgg/viewform

Our Proud Trek Partners
ThrilloFlow

Tunga Trekkers

MyAvni

lavish_kitchen_2020

Nomad Ventures India

१९ फेब्रुवारीशिवजयंती 🎉🙏श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा🙏प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,...
19/02/2024

१९ फेब्रुवारी
शिवजयंती 🎉🙏

श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांना मानाचा मुजरा🙏

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !


  😍✅   ⛰️   ⏺️  📍   📍   🗓️ Date: 🗓️Batch 1: 18th Feb🗓️Batch 2: 19th Feb ☎️ Contact following trek leaders to confirm you...
05/02/2024

😍



⛰️

⏺️

📍

📍

🗓️ Date:
🗓️Batch 1: 18th Feb
🗓️Batch 2: 19th Feb

☎️ Contact following trek leaders to confirm your seats:
Dadar Mumbai :-
091371 17374
098238 03858

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👬 Come! Join us on next adventure! ⛰️🧗‍♂️🤟
------------------------------------------------------
करना है तो करना है. 🚩
Tunga Trekkers 🕉️
______________________________

🐅🐗🐍🐂🐒🐆🦔🦨🐿️🦇🐾 🪶🦉JUNGlLEE JAIGAD 🚩EVENT INFORMATIONDear Trekkers,We  are happy to invite you for a one day Trek to Jungli ...
01/02/2024

🐅🐗🐍🐂🐒🐆🦔🦨🐿️🦇🐾 🪶🦉
JUNGlLEE JAIGAD 🚩

EVENT INFORMATION
Dear Trekkers,
We are happy to invite you for a one day Trek to Jungli Jaigad this Saturday, on 16-17 Feb 2024. Jungli Jaigad fort is an offbeat destination situated in Satara. Fort is located beautifully in thick jungle belonging to Koyna wildlife sanctuary, displaying breathtaking views and natural surroundings; due to which, you would see various birds and wild animals. Don’t be surprised if you spot any wild animal on your trek to Jungli Jaigad Fort.

ऊंची: 3164 / Height : 3164 ft.
प्रकार: गिरीदुर्ग / Type: Hill Fort
डोंगररांग: महाबळेश्वर कोयना / Fort Range: Mahabaleshwar, Koyana
जिल्हा: सातारा / District: Satara
श्रेणी: मध्यम / Difficulty: Medium

👉 Inclusion :-
✔️Travelling from DADAR To DADAR 🚌
✔️ breakfast and Lunch (veg)
✔️Emergency First aid
✔️Trek Expertise
✔️Forest Entry
✔️ Guide

Pickup Location 📍
Dadar - Sion - Chembur - Vashi - Panvel

💸Cost - 2200/-

(LIMITED Entries) mumbai
👉For Registration ☎️
091371 17374 sneha
093591 31134 Amar
98238 03858 vinod

Safety in the Mountains is the key to a real Adventure...! सह्याद्री आणि त्यातील गडकोट हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा व...
27/12/2023

Safety in the Mountains is the key to a real Adventure...!

सह्याद्री आणि त्यातील गडकोट हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यात इतिहास, भुगोल, पर्यावरण बरंच काही अभ्यासलं जातं.

त्याच बरोबर हल्ली बरेचदा सह्याद्री तील सेफ्टी (safety) हा विषय ऐरणीवर येतो. ह्या अफाट सह्याद्री कडून घेण्यासारखं खुप काही आहे. पण ते धाडस करताना स्वतः ची आणि आपल्या ट्रेकर बिरादरीची काळजी घेणं हा चर्चेचा नसून कृतीचा विषय आहे.

ह्याच विचारातून आम्ही काही संस्था एकत्र येऊन वेळोवेळी ट्रेकर्स करता बेसिक सेफ्टी आणि प्रथमोपचार प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेत असतो.

भीमाशंकर पटृटृयातील पदरगड आपणा सर्वांना माहीतच असेल. येथे चिमणी क्लाईंबची मजा घेण्यास बरेच ट्रेकर्स येत असतात.

खुद्द तुंगा आणि नोम्याडचा कुसुर ते माळशेज ह्या पट्ट्यात वर्षभर वावर असतो आणि वर्षाचे बावन्न ही आठवडे भीमाशंकर ट्रेक चालू असतो.

त्यामुळे जेव्हा पदरगडाचा चिमणीतील बोल्ट तुटल्याचे आमचा हक्काचा स्थानिक वाटाड्या अमर चिमटे हृयाने कळल्यावर तातडीने घरचे कार्य असल्यासारखी आमची टीम तिथ पोहोचली.

तिथ आता चिमणीत वरच्या अंगाला एक रिंग बोल्ट; चिमणीत वरती ऊजवीकडे एक मेख. वरच्या टप्प्यावर एक मेख आणि रिंग बोल्ट टाकून रुट सेफ केला आहे ह्याची ट्रेकरमंडळींनी नोंद घ्यावी.

सह्याद्रीत फिरताना बरोबर एक टीम रोप, प्रत्येकाकडे एक पर्सनल स्लिंग, क्याराबिनर, टीम प्रथमोपचार किट असावी आणि हे वापरण्याचे तंत्र आणि मंत्र जाणण्याची आमच्या तर्फे सर्वांना कळकळीची विनंती.

या ठिकाणी किरण अडफडकर सरांचे आम्ही निश्चितच आभारी आहोत रिंग बोल्ट व तमाम साहस प्रेमाने सतत देत असलेल्या मार्गदर्शनासाठी.

आपलेच...
१.विवेक पाटिल : 9324094270
२.संकेत नवघरे : 9004615562
३.स्नेहा काटकर : 9702640570
४.अमर चिमटे : 9359131134
५.गणेश गजरे : 7738374948

Tunga Trekkers
Nomad Ventures India



#अपघातमुक्तसह्याद्री

पद्मदुर्ग 🚩राजपुरी खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येस सुमारे तीन किलोमीटरवर असेलेल्या कांसा बेटावर शिवरायांनी हा ‘प...
23/12/2023

पद्मदुर्ग 🚩

राजपुरी खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येस सुमारे तीन किलोमीटरवर असेलेल्या कांसा बेटावर शिवरायांनी हा ‘पद्मदुर्ग’ किल्ला बांधला. आजच्या नकाशाप्रमाणे हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात मोडतो.

निजामशाहीच्या काळात सिद्दी घराण्यानं समुद्र किनारपट्टीवर सत्ता काबिज केली आणि या किनारपट्टीवर काही जलदुर्ग आणि भुईकोट किल्ले बांधले.

दांडा राजपुरी म्हणजे जंजिरा हा त्यांपैकीच एक. जंजिरा जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न केला, पण जंजिरा जिंकणं त्यांना शक्य झालं नाही.

मात्र, सिद्दीच्या कुरापती तर वाढतच होत्या आणि त्या रोखणं मराठा साम्राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं बनलं होतं. त्यामुळेच सिद्दीच्या कुरापतींवर नजर ठेवण्यासाठी आणि त्या रोखण्यासाठी जंजिऱ्याच्या उरावरच शिवरायांनी ‘पद्मदुर्ग’ बांधला. 🚩


🚩

🚩Upcoming weekend Trek🚩✅ @ RegistrationOpen 📍  parvat trek 800/- ⛰️  One Day offbeat Trek 🗓️ Date 10th December sunday 2...
04/12/2023

🚩Upcoming weekend Trek🚩
✅ @ RegistrationOpen

📍 parvat trek 800/-

⛰️ One Day offbeat Trek

🗓️ Date 10th December sunday 2023
(Leaving on 09 December saturday night)

16 december saturday
📍 1100/-

17 december sunday
📍 1200/-

🚍pickup -Drop Available mumbai

☎️ contact following Trek leader to confirm your seats: mumbai
9359131134
91371 17374
,,--------------------------------------,,

👫 come join us next trek adventure Trek ⛰️🧗‍♂️

कळसुबाईवर फुटणारं तांबडंरतनगडावरील नेढ्यातला भन्नाट सह्यवाराकोकणकड्याचा दरारालिंगाण्याचं आव्हानरायगडाचं वैभवराजगडाचा थाट...
24/10/2023

कळसुबाईवर फुटणारं तांबडं

रतनगडावरील नेढ्यातला भन्नाट सह्यवारा

कोकणकड्याचा दरारा

लिंगाण्याचं आव्हान

रायगडाचं वैभव

राजगडाचा थाट

भीमाशंकरचे घाट

राजमाचीची वाट

सिंधुदुर्गाची लाट

तोरणा वरील पहाट

सिद्धगडाची हाक

कालावंतिणीची सुंदरता

नाणेघाटाचा नानाचा अंगठा

AMK चा थरार

हरिहरच्या पायऱ्या

स्वर्गसुख देणाऱ्या सांधण-कुंडलिका दऱ्या

प्रतापगडाचा प्रताप

कोंडाण्याचा सिंह

जावळीचं निबीड अरण्य

सर्वदूर फुलांचा गालिचा

धोधो कोसळणारे धबधब्यांचे प्रपात

आणि बरंच काही......
*असं हे सह्याद्रीतलं २४ कॅरेट सोनं लुटण्यासाठी सीमोल्लंघन करत रहा*
पायाची चाकं अशीच आणखी वेग घेऊ देत..
*विजयादशमीच्या 'ट्रेक' भरून हार्दिक शुभेच्छा!*
🙏💐💐💐💐💐💐💐🙏




Incoming Trek event PADARGAD 🚩OCTOBER 22 / 29 - 10-2023 A-M-K 🚩 NOVEMBER 04/05 25/26 Contact us for more details 091371 ...
18/10/2023

Incoming Trek event

PADARGAD 🚩
OCTOBER
22 / 29 - 10-2023

A-M-K 🚩
NOVEMBER
04/05
25/26

Contact us for more details
091371 17374
093591 31134

सह्याद्री किंवा हिमालयात भटकंती करणाऱ्या सर्व भटक्यांनी आवर्जून यावे.... लिमिटेड ३० जागा.... शिबिर निशुल्क आहे... #गडवाट...
18/10/2023

सह्याद्री किंवा हिमालयात भटकंती करणाऱ्या सर्व भटक्यांनी आवर्जून यावे.... लिमिटेड ३० जागा....

शिबिर निशुल्क आहे...

#गडवाट_विशेष_उपक्रम



नवरात्री उत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा...!
15/10/2023

नवरात्री उत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा...!





Tunga Trekkers आयोजीत किल्ले राजगड. 🚩         रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ (हिंदवी स्वराज्याची पहिल्या राजधानीची भ्रमंती ) #क...
07/10/2023

Tunga Trekkers

आयोजीत किल्ले राजगड. 🚩
रविवार, १५ ऑक्टोबर २०२३
(हिंदवी स्वराज्याची पहिल्या राजधानीची भ्रमंती )

#किल्ले_राजगड 🚩
हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! हिंदवी स्वराज्याची राजधानीगडांचा राजा, राजियांचा गडराजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन्‌ भोरच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभे असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो.

चला तर मग आमच्या सोबत येताना हिंदवी स्वराज्याची पहिल्या राजधानीची भ्रमंती करायला.....

📍 #थोडक्यात*
नाव :- किल्ले राजगड
उंची :- १३९४मी.
प्रकार :- गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी :- मध्यम
ठिकाण :- पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव:- पाली
डोंगररांग :- पुणे
कधी निघायचे:- शनिवारी रात्री (१४ ऑक्टोबर)

#प्रमुख_आकर्षण:-
1) पद्मावती माची आणि मंदिर
2) सुवेळा माची
3) संजिवनी माची
4) बालेकिल्ला
5) नैसर्गिक नेड
6) राजवाडा

◀️ *मोहीम खर्चात खालील गोष्टी सामाविष्ट असतील.*
१)सकाळचा चहा-नाश्ता
२)दुपारचे जेवण (शाकाहारी)
३)प्रवास खर्च दादर टीटी सर्कल ते पाली गाव ते दादर.
(टोल, पार्किंग,RTO परमिट)
४) प्रथमोपचार
५) मार्गदर्शन
६) प्रवेश शुल्क

मोहीम शुल्क :- १६००/-प्रत्येकी.
८ वर्षांखालील मुलांकरीता १४००/-

#अधिक_माहितीसाठी_खालील_नंबर_वर_संपर्क_साधावा

मुंबई:- 091371 17374
+91 93591 31134

________________________________
Come..! and join us for next adventure.
_________________________________
Follow:- tunga_trekkers



श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!   #श्रीकृष्ण  #जन्माष्टमी  #गोपाळकाला
06/09/2023

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!



#श्रीकृष्ण #जन्माष्टमी #गोपाळकाला

 Trekker लोकांना इतर वन्य जीवांप्रमाणेच साप ह्या प्राण्याचे आकर्षण आणि दर्शन मुबलक प्रमाणात होत असते. खरेतर इतर सर्व प्र...
21/08/2023



Trekker लोकांना इतर वन्य जीवांप्रमाणेच साप ह्या प्राण्याचे आकर्षण आणि दर्शन मुबलक प्रमाणात होत असते. खरेतर इतर सर्व प्राण्याप्रमाणेच साप ही अभ्यासाचा आणि respect देण्याचा किंवा जिओ और जीने दो चा विषय आहे. पण एक अनामिक भीती किंवा / Thrill seeking प्रवृत्ती बरेचदा सापाच्या आणि तुमच्या जीवावर बेतू शकतात. म्हणून हा छोटासा लेखन प्रपंच. विषय प्रचंड क्लिष्ट आणि technical आहे तरी सुरक्षेच्या दृष्टीने काही मुद्दे इथे मांडलेत.

मुळात तुम्ही खरेखरे सर्प अभ्यासक किंवा सर्पमित्र नसाल तर परिस्थितीनुसार सापाला त्याच्या वाटेने जाऊ द्यावे. वाट चुकलेल्या बिचार्या जीवाला हाताळून तुमचे फेसबुक /Insta likes करता अडचणीच्या ठिकाणी फोटो आणि अभ्यासाचा अट्टाहास ठेऊ नये. गृपमध्ये पोर-पोरी बाळा बाळींना impress करण्यासाठी तर मुळीच नाही. अगदीच प्रसंग बाका असेल तर गृपमधील जवाबदार व्यक्तीने गुपचुप योग्य पद्धतीने हाताळून rescue करून गाजावाजा न करता त्वरीत लांब सोडावे. हल्ली गावातली लोकही बरेचदा हा protocol follow करतात. तुम्ही हुशार आणि समजुतदार आहेत. तुमच्यापेक्षा सापाच्या जीवाला जास्त धोका आहे.

तुमचा INDIAN BIG FOUR ( common Krait, russell's viper , saw scaled viper and spectacled cobra ) चटकन आणि न चुकता identify करण्याइतका तरी अभ्यास योग्य मार्गदर्शनाखाली आणि controlled environment मध्ये कधीतरी झालेला असावा. अजूनही आपल्याकडे अजगर समजून viper ला पप्पी ( kiss of death ) दिल्याच्या घटना घडतात आणि नाग पाहिल्यावर तर सर्वच निलकंठ वगैरे होतात.

safe, immediate and effective हे तीन शब्द कुठल्याही snake bite case मध्ये ध्यानात ठेवा. तुमचा सापांचा अभ्यास ,अनुभव कितीही कमी जास्त असला तरी कुठल्याही snake bite case मध्ये ( विषारी, बिनविषारी कुठलाही) Victim ला stable करून त्वरीत जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाणे हे तुमचे आद्यकर्तव्य समजा. कुठला साप चावला तो पकडून बरोबर ओळखा परेडला घेऊन जायची तसदी घेऊ नका आणि तुम्ही धावपळ करा पेशंटला धावायला लाऊ नका. एकाचे दोन होतील. अश्या प्रसंगी अडनिड्या जागी individually आणि as a team कसे वागायचे? काय करायचे? Casualty ला कसा first aid द्यायचा ?कशी carry करायची? कुठे न्यायचे ह्याकरता basic wilderness first aid चा classroom + real time scenario practice अधूनमधून करणे गरजेचे.

आपल्याकडे "नागमणी ते नागीन का इन्तेकाम" अंधश्रद्धांची कमी नाहीय. बिचारे किती साप गुप्तधन, जारणमारण विधीपायी बळी जात असतील ? पण इथं फक्त तुमच्या जीवाचा स्वार्थी विचार केलात तरी मांत्रिक, जडीबुटी, नाजाफाजा, तोंडाने विष चोखणे , जखमेजवळ घाव करणे वगैरे जितेंद्र, अमरिशपुरी, श्रीदेवीछाप प्रकार करू नका.

शाळेत कधीतरी तुम्ही torniquet किंवा आवळपट्टी विषयी वाचले असेलच. पण modern first aid protocol नुसार snake bite victim ला उपलब्ध असल्यास योग्य पद्धतीने joint stabilize करून continuous pressure bandage बांधण्याचा सल्ला दिला गेलाय. एक सुजाण नागरिक म्हणा किंवा सजग trekker तुम्हाला first aid चे प्रशिक्षण घेणे आणि ते वेळोवेळी update करत राहणे किती गरजेचे आहे हे वेगळे सांगायला नको.

सुजाण नागरिक असण्याचा विषयच निघालाय तर तुम्हाला तुमच्या भवतालात , जिथे भटकायला जाता तिथे जवळपास कुठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तेथे anti venom उपलब्ध आहे का? ह्याची माहिती करून ठेवणे. तसेच खात्रीलायक सर्पमित्रांचे contacts हाताशी असणे तुमचे कर्तव्य बनते. तसेच स्थानिक प्रशासनाकडे विशेषतः गावखेड्यात ह्या गोष्टींचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

टीप : सुरवातीलाच नमुद केल्याप्रमाणे साप आणि snake bite first aid हा वेळ देऊन अभ्यास करण्याचा विषय आहे. आम्ही ( सह्याद्री EMERGENCY RESPONSE TEAM ) च्या माध्यमातून ह्या विषयावर workshop घेत असतो आणि स्वतःला आणि इतरांनाही experts च्या मार्गदर्शनाखाली up to date ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🐍💐🕉️
21/08/2023

नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🐍
💐🕉️

Address

Mumbai
400016

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tunga Trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tunga Trekkers:

Videos

Share

Where adventure meets nature

How we started

Over a decade ago, a bunch of friends set out on a trek to experience the serene surroundings, the crisp clean air and the inimitable beauty of the Sahyadri range of the Western Ghats. This is how Tunga Trekkers was born. However, what started as a couple of leisure treks to rejuvenate and educate ourselves about the rich heritage and culture of Maharashtra and of course to bask in the glory of nature, was soon transformed in purpose and intent.

While we travelled far and wide, absorbing a treasure trove of information and beauty, we couldn’t help but find ourselves drawn to the lives of local tribes of that area, feel their deprivation and empathise with the hardships they faced. Difficult to access, these villages, PADA as we call them, still struggle to make ends meet. Every day they fight new battles and basic human rights such as primary education and healthcare elude them. So, we at Tunga Trekkers decided to take things in our hands.

Journey so far

Nearby travel agencies


Other Eco Tours in Mumbai

Show All